शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून महिलेची १.७ कोटीची फसवणुक

सायबर ठगांना विविध बँकेतील खाती पुरविणार्‍या चौकडीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जुलै २०२६
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून एका महिला व्यावसायिकाची एक कोटी सात लाख रुपयांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली असून या टोळीने या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी असलेल्या सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच बँक खात्यात इतर गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले आहे. अटक आरोपींमध्ये संदीप गोपाल अग्रवाल, जगजीतसिंग सुरजसिंग शरेशीत, मनिष कांतीभाई पटेल आणि शिबू नारायणन यांचा समावेश आहे. अटकेनतर चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

४३ वर्षांची तक्रारदार महिला निधी मोहनलाल सराफ ही तिच्या आई-वडिल आणि भावासोबत गोरेगाव परिसरात राहते. तिची एक खाजगी कंपनी असून ही कंपनीत इन्वेस्टमेंट बँकींगचे काम करते. मार्च महिन्यांत तिला व्हॉटअपवर एक शेअर ट्रेडिंगची जाहिरात दिसली होती. ही जाहिरात ओपन केल्यानंतर तिला अर्जुन मेहता या व्यक्तीने क्यूयुए सिक्युरिटीज या अमेरिकनस्थित कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. या गु्रपमध्ये ९३ हून अधिक सभासद होते. जूनपर्यंत ग्रुपमध्ये येणारे सर्व मॅसेज ती पाहत होती. याच दरम्यान तिला अर्जुन मेहताने संपर्क साधून तिला त्याच्या कंपनीविषयी माहिती दिली होती.

ही कंपनीत शेअर ट्रेडिंग क्षेत्रात कार्यरत असून कंपनीच्या माध्यमातून अनेकांनी शेअरमध्ये गुंतवणुक केली आहे, या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला आहे, त्यामुळे तिनेही शेअरमध्ये गुंतवणुक करावी, या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्याने तिला ट्रेडिंग अकाऊंट ओपन करावे लागेल असे सांगून तिला एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन तिने तिची वैयक्तिक माहिती अपलोड केली. त्यानंतर कंपनीत तिचे एक ट्रेडिंग अकाऊंट सुरु झाले होते. याच अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करन तिने काही शेअरसह आयपीओमध्ये गुंतवणुक केली होती. जूनपर्यंत तिने वेगवेगळ्या शेअर आणि आयपीओमध्ये १ कोटी ७ लाख ३७ हजार २०८ रुपये गुंतविले होते.

या गुंतवणुकीवर तिला काही दिवसांत ३ कोटी ६० हजार ४० हजार २६४ रुपयांचा प्रॉफिट झाला होात. ही रक्कम काढण्यासाठी तिने प्लेटफॉर्मवर एक रिक्वेस्ट पाठविली होती. यावेळी तिला कंपनीने अकाऊंट व्हेरीफिशनसाठी तेरा लाख, ट्रान्झेंशन फी म्हणून १० लाख २७ हजार आणि टॅक्स पेमेंट म्हणून २८ लाख, व अकाऊंट फी म्हणून ५ लाख रुपयांचे पेमेंट भरावे लागतील.ही रक्कम भरल्यानंतर तिला तिच्या कंपनीच्या खात्यातून तिच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करता येईल. तिने ही रक्कम भरली नाही तर तिला ती रक्कम ट्रान्स्फर करता येणार नाही. यावेळी तिने तिच्याकडे इतकी रक्कम नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तिला त्यांच्या ग्रुपमध्ये काढून टाकले होते.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईल १९३० ऑनलाईन तर उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सायबर सेल पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी संदीप अग्रवाल, जगजीतसिंग, मनिष पटेल आणि शिबू नारायण या चौघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, ही रक्कम त्यांनी गुन्ह्यांतील मुख्य आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. फसवणुकीसाठी या चौघांनी सायबर ठगांना वेगवेगळ्या बँकेत खाती उघडून दिले होते. याच बँक खात्यात या गुन्ह्यांतील इतर काही गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे दिसून आले आहे. याकामी चारही आरोपींना मुख्य आरोपींकडून ठराविक रक्कमेचे कमिशन प्राप्त झाले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page