हस्तीदंताची देवीची मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आरोपीस अटक

आरोपीकडून हस्तीदंताची पंधरा लाखांची देवीची मूर्ती जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जून २०२६
मुंबई, – हस्तीदंताच्या देवीच्या मूर्तीची विक्रीसाठी आलेल एका आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आयाज आयुब चारोलिया असे या ३९ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पंधरा लाखांची हस्तीदंतपासून बनविलेली एक सुबक कोरीव काम केलेली देवीची मूर्ती जप्त केली आहे. त्याच्याविरुद्ध वन्यजीव सुरक्षा अधिनियम कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

गोरेगाव परिसरात काहीजण हस्तीदंताची बनविलेल्या देवीच्या मूर्तीची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धारगळकर, पोलीस हवालदार जाधव, पोलीस शिपाई डफळे या पथकाने गोरेगाव येथील क्रॉस रोड, गोगटेवाडी समिती मंडळ शाळेजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

बुधवारी दुपारी पावणेतीन वाजता तिथे एक तरुण आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचे नाव आयाज चारोलिया असल्याचे उघडकीस आले. तो मालाडच्या राणी सती मार्ग, मोहम्मद चक्कीवाला, रुम क्रमांक एकमध्ये राहत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक हस्तीदंतापासून बनविलेली कोरीव काम केलेली देवीची मूर्ती जप्त केली आहे. त्याची किंमत पंधरा लाख रुपये इतकी आहे.

त्याच्याविरुद्ध नंतर वनराई पोलीस ठाण्यात वन्यजीव सुरक्षा अधिनियमच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने देवीची मूर्ती कोठून आणली, त्याला ती कोणी दिली, त्याने यापूर्वीही अशा प्रकारे मूर्तीची विक्री केली आहे, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page