फसवणुकीसाठी बँक खाते-सिमकार्ड पुरविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

ऑपरेशन गोवातर्ंगतमुंबईसह गुजरात राज्यातून बारा आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – ऑनलाईन गेमिंग फसवणुकीसाठी गोवा येथे कार्यरत असलेल्या सायबर ठगांना बँक खात्यासह सिमकार्ड ऍक्टिव्ह करुन देणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत वेगवेगळ्या परिसरातून बारा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हार्दिक किशोरभाई वढेरा, इलियास जानमोहम्मद मेमन, राज अल्पेशभाई वला, रुद महेंद्रभाई मच्छोर, निकुंज कालूभाई पटेल, योगेश प्रफुल्लभाई सोलंकी, रामभाई जगभाई मुंडवा, विशाल प्रकाशभाई बोरनिया, भावीनकुमार अरविंदभाई डांगसिया, केरुल चंदूभाई रोडानी, हितेश मुकेशभाई सोलंकी, युवराज भरतसिंग राणा अशी या अठराजणांची नावे असून ते सर्वजण मुंबईसह गुजरातचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने मंगळवार ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी फसवणुकीसाठी लागणार्‍या लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केली आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात सयबर गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाील आहे. सायबर ठग वेगवेगळे युक्त्यांचा वापर करुन सर्वसामान्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहे. त्यासाठी सायबर ठगांकडून काही तरुणांना हाताशी करुन त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकेत खाती उघडण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे अशाच सायबर ठगांना मदत करणार्‍या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. काही दिवसांपूर्वी पायधुनी पोलीस ठाण्यात एका ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांचा पायधुनी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु केला होता. याच गुन्ह्यांत एका आरोपीला पायधुनी पोलिसांनी अटक केलीद होती. त्याच्या चौकशीतून ऑनलाईन फसवणुक करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. संबंधित आरोपी वेगवेगळ्या बॅकेत खाती उघडून या खात्याची माहिती ऑनलाईन गेमिंगसाठी गोव्यात कार्यरत असलेल्या सायबर ठगांना देत असल्याचे उघडकीस आले होते.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार, कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक अजीम शेख, संकल्प मोकल, पोलीस शिपाई घाटोळ, सहाय्यक फौजदार सावंत, पोलीस हवालदार पवार, थिटमे, पोलीस शिपाई सय्यद, घरत, आव्हाड, बोटके, सिंह, महिला शिपाई प्रियांका क्षीरसागर, कळसाने, शिंदे यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने गोवा, कलंगुट येथील निकोले व्हिला ओरडे कॅलिडियम येथे छापा टाकून बारा आरोपींपा अटक केली. या कारवाईत पोलिसांनी पंधरा लॅपटॉप, १२८ एटीएम कार्ड, ८५ मोबाईल फोन, ७६ सिमकार्ड, २२ चेकबुक, ७७ पासबुक, ६ राऊटर, ३ किबोर्ड, २ माऊस आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी १०० पॅनल, रुदा नावाच्या साईटचा वापर करुन युजर अकाऊंटवरुन त्यांच्याकडे असलेल्या लॅपटॉप आणि मोबाईल फोनवरुन ऑनलाईन गेमिंग आणि सायबर फसवणुकीच्या माध्यातून आलेली रक्कम कॅश विथड्रॉवल आणि डिपॉझिटसाठी विनंती पाठवून ती रक्कम त्यांच्याकडे असलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करत होते. याकामासाठी त्यांना तीन टक्के कमिशन मिळत होते. या टोळीचे सर्व सूत्रे दुबईतील मुख्य सायबर ठग ऑपरेट करत होते. अटक आरोपींच्या चौकशीतून त्यांचे दुबईतील सायबर ठगांशी थेट संपर्क असल्याचे उघडकीस आले. त्यांनी उघडलेल्या बँक खात्याचे विश्‍लेषण केल्यानंतर सायबर नियंत्रण कक्ष हेल्पलाईन १९३० वर याबाबत एकूण ८३ तक्रारी प्राप्त झाल्याचे उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page