महिलेवर तिच्या पतीच्या मित्रांकडून सामूहिक लैगिंक अत्याचार

गुन्हा दाखल होताच तीन मित्रांना अटक व पोलीस कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – उत्तर मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणार्‍या एका नवविवाहीत महिलेवर तिच्याच पतीच्या मित्रांनी सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सामूहिक लैगिंक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तीन आरोपींना बांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पिडीत महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून काही महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांत तिचे सासूसोबत खटके उडू लागले होते, त्यामुळे ती तिच्या पतीसोबत वेगळी राहत होती. तिच्या पतीने आरोपींशी तिची ओळख करुन दिली होती. संंबंधित चारही आरोपी तिचे जवळचे खास मित्र असल्याचे त्याने तिला सांगितले होते. तिचा पती चालक म्हणून काम करत असल्याने तो सकाळी नऊ वाजता घरातून कामासाठी निघत होता. अनेकदा तो रात्री उशिरा घरी येत होता. याच दरम्यान त्याचा एक मित्र तिच्या घरी आला आणि त्याने पिडीत महिलेशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्याशी लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे त्याने तिला सांगितले होते, बदनामीच्या भीतीने तिनेही हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. याच संधीचा त्याने फायदा घेत त्याच्या इतर मित्रांना ही माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी तिला धमकावून तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता. गेल्या एक ते दिड महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. दोन दिवसांपूर्वी पिडीत महिलेने घडलेला प्रकार बांगुरनगर पोलिसांना सांगितला.

या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी मित्रांविरुद्ध सामूहिक लैगिंक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तीन आरोपी मित्रांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page