डिलीव्हरीसाठी दिलेल्या टिव्हीची अदलाबदल करुन कंपनीची फसवणुक

दोन महिन्यांत १२.३७ लाखांच्या नवीन टिव्हीचा अपहार केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – डिलीव्हरीसाठी दिलेल्या टिव्हीची अदलाबदल करुन कंपनीसह ग्राहकांची फसवणुक केल्याप्रकरणी एका डिलीव्हरी बॉयसह त्याच्या मित्रांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलियास मोडा असे या डिलीव्हरी बॉयचे नाव असून त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने मे ते जुलै २०२६ या कालावधीत कंपनीने डिलीव्हरीसाठी दिलेल्या १२ लाख ३७ हजार रुपयांच्या २५ टिव्हीचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत संबंधित आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

निलेश एस्साकी हे नालासोपारा येथे राहत असून ते एनटेक्स ट्रान्सपोर्टशन सर्व्हिस कंपनीत स्टेशन मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीचे मुख्य कार्यालय साकिनाका येथील चांदीवली, बुमरँग इमारतीजवळील टेक्स सेंटर नारायण प्लाझामध्ये तर दुसरे कार्यालय पुणे येथील पिंपळे सौदागर येथे आहे. त्यांच्या कार्यालयात एका खाजगी कंपनीचे पार्सल येतात, ते पार्सल नंतर त्यांच्या डिलीव्हरी बॉयच्या माध्यमातून संबंधित ग्राहकांना डिलीव्हर केले जाते. ग्राहकाने ते पार्सल रद्द किंवा रिजेक्ट केले तर ते पार्सल त्यांच्या कंपनीच्या गोदामात ठेवले जाते. त्यासाठी त्यांच्या कार्यालयाचे काम २४ तास चालत असून तिथे सध्या ३० कर्मचारी कामाला आहेत.

तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या कंपनीत समीर सलीम शेख, लकी रामकिशोर कथारिया आणि अलियास मोडा हे तिघेही डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होते. २५ मेला त्यांच्या खाजगी कंपनीने त्यांच्या कंपनीकडे इन बॉण्ड टू आऊट बॉण्डचे सीसीटिव्ही फुटेजची मागणी केली होती. त्यामुळे त्यांना सीसीटिव्ही ड्राईव्ह लिंकवर पाठविण्यात आले होते. त्यात या तिन्ही डिलीव्हरी बॉयच्या पार्सलबाबत कंपनीत तक्रारी आल्या होत्या. ग्राहकांना जुना टिव्ही डिलीव्हरी होत असून ग्राहक पार्सल घेण्यास मनाई करत आहे.

पार्सल परत येत असल्याने कंपनी प्रोसेसप्रमाणे पार्सल ताब्यात घेत होते. त्यामुळे निलेश एस्साकी यांनी खाजगी कंपनीला त्यांच्या डिलीव्हरी बॉयकडून काही तक्रार असल्यास कळविणयची विनंती केली होती. त्यामुळे कंपनीने या डिलीव्हरी बॉयच्या कामाची चौकशी केली असता त्यात अलियास हा डिलीव्हरीसाठी दिलेले टिव्ही काढून त्यात जुने टिव्ही ठेवत होता. याकामी त्याला त्याला त्याचे काही मित्र मदत करत होते. त्यामुळे बहुतांश ग्राहक टिव्ही पार्सल घेत नव्हते. त्याने कंपनीला प्रचंड नुकसान झाले होते.

यासंदर्भात आर्यन पाल या कर्मचार्‍याची जबानी नोंेदविण्यात आली होती. त्यानेही अलियासने त्याला दिलेल्या पार्सलमधील नवीन टिव्ही काढून त्यात जुना टिव्ही ठेवला होता. त्यासाठी त्याला अलियासने पाच हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. तपासात अलियासने काही वर्षांत १२ लाख ३७ हजार ३९९ रुपयांचे २५ नवीन टिव्ही पार्सलमधून काढून त्यात जुने टिव्ही ठेवून कंपनीची फसवणुक केली होती. २५ मे ते १० जुलै २०२६ या कालावधीत अलियासने हा संपूर्ण घोटाळा केला होता.

तपासात आलेल्या या माहितीनंतर निलेश एस्साकी यांनी कंपनीच्या वतीने साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी अलियासने त्याच्या मित्रांच्या मदतीने ग्राहकांना डिलीव्हरीसाठी दिलेल्या १२ लाख ३७ हजाराचे २५ टिव्ही काढून त्यात जुना टिव्ही ठेवून कंपनीची फसवणुक केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर २४ वर्षांच्या अलियास मोडा याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अलियासह त्याच्या मित्रांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page