राज्य पोलीस दलातील चौदा आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या
विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्त म्हणून बदली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जून २०२६
मुंबई, – राज्य पोलीस दलातील चौदा आयपीएस अधिकार्यांच्या मंगळवारी सायंकाळी गृहविभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी बदल्या केल्या आहेत. त्यात नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील यांची तर सायबर विभागाचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरारचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
मंगळवारी गृहविभागाकडून राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली तर नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली दाखविण्यात आली आहे. मिरा-भाईंदर-वसई-विरारचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांची राज्य गुन्हे अभिलेख विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचय पोलीस महानिरीक्षक तर सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरारचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
इतर पोलीस अधिकार्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची नवी मुंबईतील डायल ११२, हिंगोलीचे पोलीस अधिक्षक निलभ रोहन यांची नांदेड, नांदेडचे पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार यांची पुणे शहर, बुलढाण्यातील खामगावचे अप्पर पोलीस अधिक्षक श्रेणिक लोंढा यांची हिंगोली, नवी मुंबईतील डायल ११२ च्या पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महांडळ, नागपूरचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगर, अमरावतीचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर, चंदूपरच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सतराचे समादेशक पियुष जगताप यांची बुलढाण्यातील खामगाव, गडचिरोलीच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेराचे समादेशक नारायण शिरगावंकर यांची अहिल्यानंतर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोसीसचे समादेशक तर अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिक्षक प्रांजली सोनावणे यांची अमरावती येथे बदली करण्यात आली आहे.