मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मुंबई, – उत्तरराखंड येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या हेरॉईनसह दोघांना कांदिवली युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. अरमान आयुब मलिक आणि दानिश भूरा अली अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तराखंडचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 765 ग्रॅम हेरॉईनचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 3 कोटी 82 लाख रुपये इतकी आहेत. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अॅण्टी नारकोटीक्स सेलने ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना उत्तरराखंड येथून काहीजण कोट्यवधी रुपयांचे हेरॉईन घेऊन आले आहे. या हेरॉईनची डिलीव्हरी अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरात होणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, सहाय्यक फौजदार विनोद निकम, पोलीस हवालदार सुधाकर देसाई, भरत मोहिते, अरुण राठोड, सुभाष खेमनर, पोलीस शिपाई राहुल वलवे आदी पथकाने अंधेरी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
सोमवारी रात्री यारी रोड परिसरात दोन तरुण आले होते, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच या दोघांनाही पळून जाण्याची कुठलीही संधी देता या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह त्यांच्या सामानाची तपासणीदरम्यान पोलिसांना 765 ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3 कोटी 82 लाख रुपये आहे. तपासात ते दोघेही उत्तराखंडच्या हरिद्वार आणि देहरादूनचे रहिवाशी आहेत. जप्त केलेले हेरॉईन ते दोघेही उत्तराखंड येथून मुंबई शहरात विक्रीसाठी घेऊन आले होते, मात्र हेरॉईन विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते हेरॉईन कोणी दिले, हेरॉईन ते कोणाला देणार होते, त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोण सहकारी आहेत याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.