दुप्पट रक्कमेचे आमिषाने व्यावसायिकाची साडेअठरा लाखांची फसवणुक
गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीस दिड वर्षांनी अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – वीस महिन्यांत गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट करुन देतो असे सांगून एका व्यावसायिकाची सुमारे साडेअठरा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. संतोषकुमार भगवान सिंग असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होत, अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोषकुमारने अशाच प्रकारे इतर काही लोकांना दुप्पट रक्कमेचे गाजर दाखवून गंडा घातल्याचे बोलले जाते.
फारुख चाने मणिहार हे व्यावसायिक असून ते कांदिवलीतील परिसरात राहतात. सहा वर्षांपूर्वी त्यांची संतोषकुमारशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली होती. संतोषकुमारने त्याच्या मालकीची गोगेर्टन म्युचअल बेनिफिटस निधी लिमिटेड नावाची एक कंपनी असल्याचे सांगितले होते. या कंपनीत त्यांना गुंतवणुक करण्याचा सल्ला देत त्याने त्यांना वीस महिन्यांत गुंतवणुक रक्कम दुप्पट करुन देतो असे आमिष दाखविले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याच्या कंपनीत टप्याटप्याने साडेअठरा लाखांची गुंतवणुक केली हेती. मात्र पाच वर्ष उलटूनही त्याने त्यांना दुप्पट रक्कम करुन दिले नाही किंवा गुंतवणुक केलेली मूळ रक्कम परत केली नव्हती.
वारंवार विचारणा करुनही तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संतोषकुमार सिंग याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संतोषकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दिड वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता.
तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अखेर दिड वर्षांनी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनवली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून त्याने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे.