मध्यप्रदेशातून मुंबई शहरात तीन संशयित व्यक्ती दाखल झाल्याचा ट्विट
मुंबई पोलीस अलर्ट मोडवर; तिन्ही संशयितांचा एटीएसकडून शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – मध्यप्रदेशातील रतलाम रेल्वे स्थानकातून अवंतिका एक्सप्रेसमधन तीन संशयित व्यक्ती मुंबई शहरात झाले असून रेल्वे प्रवासादरम्यान त्यांचे बोलणे संशयास्पद होते असा ट्विट मुंबई पोलिसांच्या दशहतवाद विरोधी पथकाला प्राप्त झाला आहे. या ट्विटनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून या तिन्ही संशयितांचा एटीएसकडून शोध सुरु आहे. ते तिघेही बोरिवली रेल्वे स्थानकात उतरले होते, त्यामुळे रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या तिन्ही संशयित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
मुंबई शहरात आगामी दिवसांत मोठ्या प्रमाणात घातपात होणार असल्याचे काही मॅसेज आणि कॉल मुंबई पोलिसांना प्राप्त झाले होते. प्रत्येक माहितीनंतर मुंबई पोलिसांकडून त्याची शहानिशा केली जाते. काही दिवसांपूर्वीच कुरार पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई शहरात घातपात घडविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत येणार्या हिंदूच्या सणात हा घातपात होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
या घटनेनंतर मंगळवारी पंधरा लोक मुंबई शहरात आरडीएक्स घेऊन निघाल्याचे माहिती दिल्ली कंट्रोल रुममधून मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला देण्यात आली होती. या संभाव्या घातपाताच्या पार्श्वभूमी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन जास्तीत जास्त भर देण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. तरीही संभाव्य घातपाताचे मॅसेज आणि कॉल येण्याचे सत्र थांबले नाहीत.
रविवारी विशाल राणा नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या एटीएस कंट्रोल रुमला एक ट्विट केले आहे. त्यात या व्यक्तीने ४० वर्षांखालील तीन संशयित व्यक्ती मध्यप्रदेशातील रतलाम येथून ट्रेनमध्ये चढले आहे. सकाळी सहा वाजता अंवतिका एक्सप्रेस ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकात आली आहे. या तिन्ही व्यक्तीचे बोलणे संशयास्पद वाटत होते. बोरिवली रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीची ओळख पटू शकेल असे सांगितले. या माहितीनंतर संबंधित ट्विट वरिष्ठ पोलिसांसह काळाचौकी आणि चारकोप एटीएसला देण्यात आली आहे.
या माहितीनंतर चारकोप आणि काळाचौकी युनिटने संयुक्तपणे तपास सुरु केला आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात संबंधित तिन्ही संशयित व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम आहे. हा ट्विट कोणी कोणी आणि कोठून पाठविला, त्यात किती सत्यता आहे याचीही पोलिसांकडून शहानिशा केली जात आहे. दरम्यान या घटनेने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून तिन्ही संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास एटीएस अधिकार्यांनी नकार दिला आहे.