पतीच्या विवाहबाह्य संबंधातून नर्स पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

सात महिन्यानंतर डॉक्टर पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – पतीच्या विवाहबाह्य संबंधातून नर्स पत्नीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, या आत्महत्येनंतर सात महिन्यानंतर मृत पत्नीच्या डॉक्टर पतीसह त्याची प्रेयसी आणि आईविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सारंग भुपेंद्र दवे, लता भुपेंद्र दवे आणि चांदनी बारोट अशी या तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

विजय श्रीराम बोरसे हे वर्धा येथील दहेगावचे रहिवाशी असून ते मजुरीचे काम करतात. दिपाली ही त्यांची मोठी मुलगी असून ती वाडिया रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. तिथेच सारंग दवे या डॉक्टरशी तिची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. २०१७ साली या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ते दोघेही चुन्नाभट्टी येथे राहत होते. या लग्नाला दवे कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी दिपालीला सून म्हणून कधीही स्विकारले नाही. गेल्या दोन वर्षांपासून सारंग हा अहमदाबाद येथे कामाला होता. त्यात त्यांच्यात नेहमीच किरकोळ कारणावरुन वाद होत होते. मार्च २०२६ रोजी दिपाली ही तिच्या वर्धा येथील घरी आली होती, यावेळी ती प्रचंड मानिसक तणावात असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

तिच्याशी चौकशी केल्यानंतर तिच्यापासून सारंगला वेगळे व्हायचे होते. २ एप्रिल २०२६ रोजी दिपालीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती समजताच विजय बोरसे हे मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना दिपालीने एक सुसायट नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने स्वतहून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. माझ्यासोबत जे झाले ते मी कधीच विचार केला नव्हता. सारंगचे चांदनी नावाच्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते, या संबंधातून त्यांच्यात नात्यात दुरावा निर्माण झालाहा होता. त्यात सारंग, सासू लता दवे आणि चांदनी बारोट यांच्याकडून तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण सुर होता. त्यातून तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते, याच नैराश्यातून तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या आत्महत्येने बोरसे कुटुंबिय प्रचंड मानसिक नैराश्यात आले होते. अखेर त्यांनी त्यांच्या मुलीला न्याय देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते पुन्हा मुंबईत आले आणि त्यांनी दिपालीच्या पतीसह सासू आणि प्रेयसीविरुद्ध दिपालीचा मानसिक व शारिरीक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सागर दवे, लता दवे आणि चांदनी बारोट यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page