दादर-धारावीतील दोन अपघातात दोन वयोवृद्धांचा मृत्यू

दोन्ही आरोपी चालकाविरुद्ध स्वतंत्र अपघाताची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जून २०२६
मुंबई, – दादर आणि धारावी येथील दोन अपघातात दोन वयोवृद्धांचा मृत्यू झाला. किरण सदाशिव किर (६२) आणि अनिस ऊर्फ अंधेरी (७५) अशी या दोन्ही मृत वयोवृद्धांची नावे आहेत. याप्रकरणी दादर आणि शाहूनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन्ही आरोपी चालकांना ताब्यात घेतले होते.

हा अपघात गुरुवारी रात्री उशिरा दिड वाजता धारावीतील माहीम फाटक, सन्नाउल्ला कंपाऊंड, नूर हॉटेलसमोरील मोकळ्या मैदानात घडली. अनिस हा याच परिसरात राहत असून दिवसा कचरा वेचण्याचे काम करुन रात्री मिळेल तिथे झोपेत होता. त्याच्या नातेवाईकाविषयी कोणालाही काहीच माहिती नाही. गुरुवारी रात्री तो नूर हॉटेलसमोरील मोकळ्या मैदानात झोपला होता. यावेळी तेथून जाणार्‍या एका टेम्पोने त्याला झोपेत असताना धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.याप्रकरणी आमीरउल्ला खान याच्या चौकशीनंतर मृत व्यक्तीची ओळख पटली होती. पोलीस शिपाई गोपाळ काळे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टेम्पोचालक इसरारअली साबीरअली याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

दुसरा अपघात गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता दादर येथीली एस. के भोले रोड, चितळे पथ कॉर्नरवरील पोर्तुगीज चर्चच्या बाजूला असलेल्या बोलेवाडी परिसरात झाला. सुहास सदाशिव किर हे ६७ वर्षांचे वयोवृद्ध दादर येथे राहतात. त्यांचा मृत किरण हा भाऊ असून तो अविवाहीत आहे. सध्या तो दादर टीटी परिसरातील एका चिकन शॉपमध्ये काम करतो. गुरुवारी सकाळी किरण हा नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघून गेला. सकाळी सव्वादहा वाजता तो बोलेवाडीजवळून पायी जात होता. यावेळी मागून भरवेगात जाणार्‍या एका पाण्याच्या टँकरने त्याला धडक दिली होती.

त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर वॉर्ड क्रमांक २०/अ मध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्यात उपचारादरम्यान सायंकाळी चार वाजता त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शाहूनगर आणि दादर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करुन दोन्ही चालकांना ताब्यात घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page