आठ व नऊ वर्षांच्या मुलीवर अश्‍लील चाळे करणारे गजाआड

आईस्क्रिमसह मोबाईलवर अश्‍लील व्हिडीओ दाखवून विनयभंग

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२६
मुंबई, – आठ आणि नऊ वर्षांच्या मुलीशी जवळीक साधून त्यांच्याशी अश्‍लील चाळे करुन विनयभंग केल्याप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव येथे आईस्क्रिमच्या बहाण्याने तर अंधेरीत मोबाईलवर अश्‍लील व्हिडीओ दाखवून या दोन्ही मुलींचा विनयभंग झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पहिल्या गुन्ह्यांतील ३८ वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून बळीत तिची आठ वर्षांची मुलगी आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता जवळच असलेल्याा एका सुपर मार्केटमध्ये आईस्क्रिम घेण्यासाठी गेली होती. आईस्क्रिम घेतल्यानंतर तिने पैसे देण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला पुन्हा आईस्क्रिम देण्याचा बहाणा करुन दुकानात बोलाविले. तिच्या छातीसह शरीराच्या इतर भागांवर नकोसा स्पर्श करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तिने स्वतला सोडविण्याचा प्रयत्न करुन त्याने तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देऊन त्याने तिची सुटका केली. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी निघून गेली. घडलेला प्रकार तिने तिच्या तक्रारदार आईला सांगितला.

दुसर्‍या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला अंधेरी येथे राहते. तिला नऊ वर्षांची एक मुलगी आहे. बुधवारी १५ जुलैला सायंकाळी सात वाजता ती घराजवळील एका दुकानात गेली होती. यावेळी या दुकानात काम करणार्‍या रवी नावाच्या एका कर्मचार्‍याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिला त्याच्या मोबाईलवर अश्‍लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या तक्रारदार आईला सांगितला. ही माहिती समजताच तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

या दोन्ही घटनेनंतर आरे आणि एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तीन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनेने गोरेगाव आणि अंधेरीतील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page