शहरात दोन घटनेत दोन व्यक्तींची मारहाण करुन हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत दोन्ही गुन्ह्यांतील पाचही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 नोव्हेंबर 2025
मुंबई, – जेवणाच्या पार्सलच्या पार्सलसह थट्टामस्करीतून झालेल्या वादातून शहरात दोन वेगवेगळ्या दोन व्यक्तींची बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन हत्या झाल्याचा प्रकार गोवंडी आणि साकिनकाा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवनार आणि साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करुन पाचही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींमध्ये शेहबाज सज्जाद हुसैन खान, जमाल हुसैन मोहम्मद हुसैन खान, सज्जाद हुसैन मोहम्मद हुसैन खान, आरिफ मोहम्मद हुसैन खान आणि मेहंदी हसन अब्दुल हाजी शेख यांचा समावेश आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिली घटना सोमवारी रात्री नऊ वाजता साकिनाका येथील जरीमरी, मुस्लिम सोसायटीमध्ये घडली. याच परिसरात मोहम्मद जावेद आसिकअली खान हा राहत होता. तिथेच शेहबाज खान, त्याचे वडिल आणि दोन्ही काका राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. ते सर्वजण उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून साकिनाका परिसरात वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता.

याच वादातून शेहबाजसह इतर तिघांनी मोहम्मद जावेद यांना हाताने, काठीने आणि लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी अवस्थेत असताना त्याने त्याचा मित्र अब्दुल कादिर याला फोनवरुन ही माहिती सांगून त्याला औषधोपचाराची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अब्दुल हा घटनास्थळी गेला होता. जखमी अवस्थेत असलेल्या मोहम्मद जावेदला त्याने सुरुवातीला सिटी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे तो त्याला घेऊन कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. रात्री बारा वाजता मोहम्मद जावेदला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. रात्री दिड वाजता ही माहिती भाभा हॉस्पिटलमधून साकिनाका पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अब्दुल कादिर याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून त्याने मोहम्मद जावेद याचे जेवणाच्या पार्सलवरुन शेहबाज खचान याच्याशी वाद झाल्याचे सांगितले.

या वादातून शहबाज याच्यासह त्याचे वडिल आणि दोन्ही काकांनी त्याला काठीने, हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. औषधोपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर चारही आरोपी पळून गेल्याने या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना चारही आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली.

या घटनेपूर्वी शुक्रवारी 31 ऑक्टोंबरला सायंकाळी साडेसात वाजता गोवंडीतील टाटानगर, दत्त मंदिरासमोर दुसरी घटना घडली होती. सुनिलकुमार युगलकिशोर गुप्ता हा कल्याण येथे राहत असून पूर्वी तो टाटानगर परिसरात राहत होता. त्यांचे वडिलोपार्जित घर असून सध्या तिथे त्याचा अविवाहीत भाऊ अरुणकुमार युगलकिशोर गुप्ता ऊर्फ पप्पू हा एकटाच राहत होता. या रुमच्या वरच्या माळ्यावर दोन रुम असून ते दोन्ही रुम त्यांनी भाड्याने दिले होते. त्यापैकी एका रुमचे भाडे सुनिलकुमार तर दुसर्‍या रुमचे भाडे अरुणकुमार घेत होता. मेहंदी हसन अब्दुल हाजी शेख हा याच परिसरात लहानपणापासून राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत.

शुक्रवारी सायंकाळी मेहंदी आणि अरुणकुमार हे दोघेही दत्त मंदिरासमोर होते. यावेळी त्यांच्यात थट्टामस्करी सुरु होती. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती. काही वेळानंतर रागाच्या भरात मेहंदीने अरुणकुमारला हाताने आणि लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अरुणकुमार हा बेशुद्ध झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते.

रात्री सव्वाअकरा वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती समजताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुनिलकुमार गुप्ता याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मेहंदी हसन शेख याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. थट्टामस्करीतून झालेल्या वादातून आरोपीने त्याच्याच मित्राची हत्या केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page