अकाऊंट अपडेटसह क्रेडिट कार्डचा दुरुपयोग करुन फसवणुक

दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – अकाऊंट अपडेटसह गहाळ झालेल्या क्रेडिट कार्डचा दुरुपयोग करुन दोन ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत २६ लाखांचा अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूर्व आणि उत्तर प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु आहे. ही रक्कम ज्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार कांदिवलीतील दामोदरवाडी परिसरात राहतात. सधष्या ते एका खाजगी कंपनीच्या जहाजावर काम करतात. चार महिने जहाजावर कामावर तर दोन महिने सुट्टीवर असतात. त्यांचे सॅलरी त्यांच्या शीप मनी या ई-वॉलेटमध्ये जमा होते. त्यांच्या ई-वॉलेटला त्यांचा ईमेल आयटी लिंक आहे. मार्च २०२६ ते जहाजावर सेंकड इंजिनिअर म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर मार्च ते मे महिन्यांची त्यांची सॅलरी त्यांच्या ई-वॉलेटमध्ये जमा झाली होती. १० जुलै त्यांच्या ईमेलवर एका कार्यालयीन नोटीस आली होती. त्यात त्यांचे अकाऊंट अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती.

या व्यक्तीने ती लिंक ओपन करुन वेबसाईटला व्हिजीट करण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना दुसरी नोटीस आली होती. जून महिन्यांची सॅलरी येणे बाकी असल्याने त्यात काही प्रॉब्लेम होऊ नये तसेच ती लिंक शीप मेनी या ई-वॉलेटमधून आल्याचे समजून त्यांनी ती लिंक ओपन केली होती. त्यात त्यांनी त्यांचे लॉगिन आयडीसह पासवर्ड ऍड केले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना व्हेरीफिकेशन सस्सेसफुली व्हेरीफाय असा मॅसेज प्राप्त झाला होता.

त्यानंतर ते साईटवरुन लॉगआऊट झाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे बॅलेन्स चेक केला. त्यात त्यांची रक्कम जशाच तशी होती. त्यामुळे त्यांना संशय आला नव्हता. २४ जुलैला त्यांचा जून महिन्यांचा पगार जमा झाला होता. त्यामुळे त्यांनी ई-वॉलेटचा बॅलेन्स चेक केला असता त्यांना त्यांच्या वॉलेटमधून सुमारे बारा लाख रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने तीन ऑनलाईन व्यवहार करुन ही रक्कम ट्रान्स्फर झाली ाहेती. अकाऊंट अपडेटच्या बहाण्याने अज्ञात सायबर ठगाने त्यांना बोगस लिंक पाठवून त्यांची फसवणुक केली होती.

दुसरी घटना कांजूरमार्ग परिसरात घडली. ४९ वर्षांचे तक्रारदार मूळचे कनार्टकचे रहिवाशी असून सध्या कांजूरमार्ग परिसरारत राहतात. ते एका खाजगी विमा कंपनीत कामाला असून चेंबूर येथे त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. त्यांच्याकडे एका खाजगी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. मंगळवारी १५ सप्टेंबरला ते त्यांच्या घरातून चेंबूर येथील कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. पूर्व दुतग्रती महामार्गावरुन जाताना त्यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे मॅसेज प्राप्त झाले होते.

त्यांनी मॅसेजची पाहणी केली असता त्यात त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन २३ ऑनलाईन व्यवहार तसेच त्यातून १३ लाख ९० हजार ७६९ रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले होते. त्यांनी त्यांचा क्रेडिट कार्ड तपासले असता त्यांच्या वॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड नव्हते. त्यांनी सर्वत्र कार्डचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच कार्ड सापडले नाही. ते कार्ड कधी आणि कुठे गहाळ झाले याबाबत त्यांना काहीच आठवत नव्हते.

त्यामुळे त्यांनी लागलीच बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करुन ही माहिती सांगून क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याची विनंती केली होती. त्यांनी त्यांना पोलिसांना तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी १९३० या सायबर हेल्पाईलसह पूर्व सायबर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर पूर्व आणि उत्तर सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page