अश्‍लील फोटो व्हायलरची धमकी देऊन खंडणीसाठी धमकी

प्रेयसीच्या तक्रारीवरुन आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जून २०२६
मुंबई, – अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर व्हायलरची धमकी देऊन एका ३० वर्षांच्या महिलेलला तिच्याच प्रियकराने खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकर गुलाम समदानी फारुखी या २९ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेला धमकावून गुलामने तिच्याकडून आतापर्यंत तीन लाखांची खंडणी वसुली केल्याचे बोलले जाते. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

३० वर्षांची पिडीत महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून ती सध्या काहीच कामधंदा करत नाही. चार वर्षांपूर्वी तिची मूळचा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर, धुमरियाच्या बादलियाचा रहिवाशी असलेल्या आरोपी गुलामशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. मोबाईलसह सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा ते दोघेही अंधेरीतील वर्सोवा बिचवर भेटत होते. तिच्याशी गप्पा माारताना तो तिच्यावर त्याचे प्रेम असल्याचे सांगत होता. त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे असे सांगून त्याने तिचा विश्‍वास संपादन केले होते.

लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातून ती दोन वेगळा गरोदर राहिली होती. मात्र लग्नापूर्वी मुल नको म्हणून तो तिला गर्भपाताचे गोळ्या देत होता. त्यातून तिचा दोन वेळा गर्भपात झाला होता. अनेकदा तो व्हिडीओ कॉल करुन तिला कपडे काढण्यास प्रवृत्त करत होता. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिनेही व्हिडीओ कॉल सुरु असताना स्वतचे कपडे काढले होते. त्याचे त्याने स्क्रिनशॉट काढून काही अश्‍लील फोटो मोबाईलमध्ये सेव्ह केले होते.

संबंधित फोटो तिला पाठवून तो तिला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकावत होता. या प्रकाराने तिला प्रचंड धक्का बसला होता. बदनामीच्या भीतीने तिने त्याला तीन लाख रुपये खंडणीस्वरुपात दिले होते, तरीही तो तिला खंडणीसाठी सतत धमकी देत होता. तिने पैसे दिले नाहीतर तिचे अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर अपलोड करुन तिची बदनामीची धमकी देत होता. त्याच्या या धमक्यांना ती प्रचंड कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने गुलामविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

तीन दिवसांपूर्वी तिने घडलेला प्रकार वर्सोवा पोलिसांना सांगून गुलामविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत गुलामला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page