जळगावच्या व्यावसायिकाची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या

कुटुंबियांच्या चौकशीनंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जून २०२६
मुंबई, – जळगावचा रहिेवाशी असलेल्या पवन सुनिल पाटील या २८ वर्षांच्या व्यावसायिकाने गुरुवारी सकाळी अंधेरीतील एका निवासी इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून त्याच्या कुटुंबियांची लवकरच जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांनी सांगितले.

ही घटना गुरुवारी १७ जूनला सकाळी पावणेआठ वाजता अंधेरीतील वर्सोवा, म्हाडा, आकाश दिप सोसायटीमध्ये घडली. पवन पाटील हा मूळचा जळगावच्या नासिराबादचा रहिवाशी असून व्यवसायाने व्यावसायिक आहे. बुधवारी १७ जूनला तो त्याच्या प्रेयसीसोबत मुंबई येथे फिरण्यासाठी आला होता. सर्व काही ठिक असताना सकाळी पावणेआठ वाजता त्याने म्हाडाच्या आकाश दिप सोसायटीच्या टेरेसवरुन उडी घेतली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी अवस्थेत पवनला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. पवन हा मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते.

त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. ते मुंबईला येण्यासाठी निघाले असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर पवनने आत्महत्या का केली याचा उलघडा होईल असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दररम्यान गुरुवारी सकाळी घडलेल्या या आत्महत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page