पोक्सोच्या गुन्ह्यांतील आरोपीला वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बूट ठेवण्याच्या बहाण्याने अकरा वर्षांच्या मुलावर अत्याचार केला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – पौक्सोच्या गुन्ह्यांतील एका २७ वर्षांच्या आरोपीला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने दोषी ठरवून वीस वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे. आकाश संजय पानपाटील असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर बूट ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अनैसगिक लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या खटल्याचा चार वर्षांत सुनावणी होऊन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पिडीत मुलगा अकरा वर्षांचा असून तो अंधेरी परिसरात राहतो. आकाश हा त्याच्या परिचित असून त्याने त्याला बूट ठेवण्याचा बहाणा करुन त्याच्या घरी आणले होते. त्यानंतर त्याने पिडीत मुलावर अनैसगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती. सुरुवातीला जिवाच्या भीतीने या मुलाने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही, मात्र नंतर त्याने घडलेला प्रकार त्याच्या पालकांना सांगितला. या घटनेनंतर त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात आरोपी आकाश पानपाटील याच्यविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७७, ५०६ (२) भारतीय दंड सहिता सहकलम ६, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्याकडे होता. तपास पूर्ण होताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध दिडोंशीतील पोक्सो कोर्टात भक्कम वस्तूनिष्ठ, भौतिक, जैविक पुरावे गोळा करुन आरोपपत्र सादर केले होते. त्यानंतर या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती. अलीकडेच खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि कोर्टाने आकाशला सर्व कलमार्ंतत दोषी ठरविले होते. ३७७ भादवी आणि ६ पोक्सो कलमांतर्गत त्याला वीस वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड, ५०६ (२) भादवी व पोक्सोच्या ५ कलमांतर्गत पाच वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून उषा जाधव यांनी कामकाज पाहिले. आरोपीला जास्तीत जास्त व्हावी यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल कदम, अजय कुलकर्णी, पोलीस हवालदार साजिद काझी, महिला पोलीस शिपाई नसरीन शेख, पोलीस हवालदार संजय चव्हाण, सागर भोसले, पोलीस शिपाई निलेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page