डोंगरी येथे बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या आरोपीला अटक

अडीच किलो वजनाची तीस लाखांची बिबट्याची कातडी हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – डोंगरी परिसरात बिबट्याची कातडीची विक्रीसाठी आलेल्या निखील सोनावणे नावाच्या एका तरुणाला डोंगरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी अडीच किलो वजनाची बिबट्याची कातडी हस्तगत केली असून त्याची किंमत सुमारे तीस लाख रुपवे इतकी आहे. ताडदेवचा रहिवाशी असलेल्या निखीलविरुद्ध पोलिसांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बिबट्या या संरक्षित वन्यजीव प्राण्याची कातडीची बेकायदेशी विक्रीसाठी काही तरुण डोंगरी परिसरात येणार असल्याची माहिती पापेलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक बाळसाहेब कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, पोलीस हवालदार विशाल सोनावणे, सुरज धायगुडे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. रविवारी सायंकाळी तिथे निखील सोनावणे आला होता,

त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना एक अडीच किलो बिबट्याची कातडी सापडली. त्याची किंमत सुमारे तीस लाख रुपये इतकी आहे. तपासात निखील हा ताडदेव येथे राहत असून तो डोंगरी परिसरात बिबट्याची कातडी विक्रीसाठी आला होता. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याविक्षरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला न्यायालया हजर करण्यात आले होते. त्याला ती कातडी कोणी दिली, तो कोणाला कातडीची विक्री करणार होता, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे वन्यजीव प्राण्यांच्या कातडीची विक्री केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page