रिबेल थाई स्पामध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

महिलेसह दोन आरोपींना अटक तर पाच महिलांची सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या एका स्पामध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा स्थानिक पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली तर पाच महिलांची सुटका केली. आशा आणि कैलास यादव अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या पाचही महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत साहिल बालानाथ पिल्लई आणि करण सी वर्धन या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

शिवाजी पार्क परिसरात असलेल्या स्टार मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर रिबेल थाई नावाचे एक स्पा असून या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली तिथे काम करणार्‍या ग्राहकासोबत शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त केले जात आहे. काही महिन्यांपासून स्पामध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एक बोगस ग्राहकाला तिथे पाठविले होते. यावेळी ग्राहकाला तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून सिग्नल प्राप्त होताच रविवारी सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी तिथे छापा टाकला होता.

यावेळी स्पामध्ये असलेल्या आशा नावाच्या महिलेसह कैलास यादव या देघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्पामधून पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली. या महिलांच्या चौकशीतून तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. आरोपी स्पामध्ये येणार्‍या ग्राहकांना मसाजसह इतर सर्व्हिसच्या नावाने बळीत महिलांना शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त केले होते. ग्राहकांकडून मिळालेली रक्कम बळीत महिलांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम ते स्वतसाठी ठेवत होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर आशा आणि कैलास या दोघांना पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमंातर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत नंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. कारवाईपूर्वीच साहिल पिल्लई आणि करण वर्धन हे दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सुटका केलेल्या सर्व महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी महिला सुधारगृहात पाठविणयात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page