गोवंडी-वांद्रे येथील पाच बोगस मुन्नाभाई एमबीबीएस गजागाड

वैद्यकीय पदवीसह परवाना नसताना रुग्णांवर उपचार करत होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – गोवंडीतील देवनार, झाकीर हुसैन नगर आणि वांद्रे येथील नौपाडा परिसरात कार्यरत असलेल्या पाच बोगस मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टरवर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली. सगीर अहमद अब्दुल माजिद हाश्मी, अखिलेशकुमार देवेंद्रकुमार दुबे, मेहमूद आलम मोहम्मद शरीफ शेख, केशवप्रसाद कुद्दूर पटेल आणि मोहम्मद आफ्ताब शौकिम खान अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या पाचजणांना देवनार आणि निर्मलनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कुठलीही वैद्यकीय पदवी आणि परवाना नसताना या मुन्नाभाईंनी परिसरात क्लिनिक थाटून रुग्णांवर उपचार सुरु केले होते, त्यामोबदल्यात त्यांच्याकडून भरमसाठी फी आकारली जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला होता. कुठलीही वैद्यकीय शाखेची पदवी संपादीत न करता, वैद्यकीय शिक्षण नसताना नागरिकांवर वैद्यकीय उपचार करुन त्यांचे आरोग्य धोक्यात आणून त्यांच्याकडून भरमसाठ फि आकारुन फसवणुक केली जात होती. याबाबत अनेक तक्रारी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्यामुळे अशा बोगस मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गोवंडी आणि वांद्रे परिसरात काही बोगस मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, युनिट आठचे प्रभारी पोलीस निरीक्षक् गणेश माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, श्रीकांत काळे, रोहन भगाडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, संदीप रहाणे, हेमंत मिर्जे, महिला उपनिरीक्षक माशेरे, पोलीस हवालदार खेडकर, सोनावणे, अतिगरे, डगळे, वानखेडे, बैलकर, ढाकणे आदी पथकाने गोवंडीतील देवनार, झाकीर हुसैन नगर आणि वांद्रे येथील नौपाडा परिसरातील क्लिनिकमध्ये कारवाई केली होती.

त्यात डॉ. सगीर क्लिनिक, गायत्री क्लिनिक, आयेशा क्लिनिक, पटेल क्लिनिक आणि आफ्ताफ खान क्लिनिकचा समावेश होता. या क्निनिकमध्ये सगीर हाश्मी, अखिलेशकुमार दुबे, मेहमूद शेख, केशवप्रसाद पटेल आणि मोहम्मद आफ्ताब खान हे रुग्णावर उपचार करताना दिसून आले. त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी आणि परवाना आदी कागदपत्रांची मागणी केली असता त्यांच्याकडे कुठलेही वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसल्याचे उघडकीस आले. ते पाचजण बोगस डॉक्टर असून त्यांनी परिसरात क्लिनिक थाटून रुग्णांवर उपचार सुरु केले होते. त्यांच्याकडून भरमसाठ फि आकारुन त्याची फसवणुक सुरु केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच या पाचही बोगस डॉक्टरांविरुद्ध देवनार आणि निर्मलनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पाचही क्लिनिकमधून पोलिसांनी १ लाख १९ हजार ३२४ रुपयांचे विविध प्रकारचे इंजेक्शन, बॉटल्स, सिरीज, ऍण्टीवायोटिक टॅबलेट्ससह इतर साहित्य जप्त केले आहे.

या पाचपैकी कोणाचेही शिक्षण पदवीपर्यंत झाले नसून काहींचे शिक्षण बारावीपर्यत झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तरीही ते परिसरात डॉक्टर म्हणून क्लिनिक थाटून रुग्णांच्या आरोग्यांशी खेळ करत होते. या पाचही आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या संपर्कात असेच काही मुन्नाभाई एमबीबीएस आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page