घरगुती वादातून पत्नीची पतीकडून गळा आवळून हत्या

हत्येप्रकरणी आरोपी पतीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – क्षुल्लक घरगुती वादातून पत्नीची पतीनेच गळा आवळून हत्या केल्याची घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. शबीना मेहमूद मोमीन असे या मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा पती मेहमूद मोमीन याला पवई पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास पवईतील खालचा तुंगा, केबीएम कंपाऊंड, सुलोचनाबाई चाळीत घडली. याच चाळीत मेहमूद मोमीन हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. शबीना ही त्याची पत्नी होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद होत होती. मंगळवारी सायंकाळी चार वाजता याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी मेहमूदने शबीनाची हाताने आणि पायाने गळा आवळून हत्या केली होती. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला आणि घरातून पळून गेला.

स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीलद होती. शबीनाला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात शबीनाची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

या घटनेनंतर पोलीस शिपाई चेतन चंद्रकांत कानडे यांच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी मेहमूद मोमीनविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मेहमूदला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी अंधैरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page