बहिणीला पुण्याला सोडले म्हणून भावावर चाकूने प्राणघातक हल्ला

बहिणीच्या प्रियकराविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – सततच्या शिवीगाळ तसेच मानसिक शोषणाला कंटाळून पुण्याला गेलेल्या प्रेयसीच्या भावावर प्रियकराने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शंकर मोतीराम जाधव हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी रोशन डावरे या बहिणीच्या प्रियकराविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध घेत आहे. बहिणीला पुण्याला जाण्यासाठी मैत्री पार्कला सोडले म्हणून रोशनने शंकर जाधववर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

शंकर जाधव हा रिक्षाचालक असून तो सध्या कुर्ला येथील हलाव पुल रोड, जय शंकर चौकातील म्हणासजी चाळीत राहतो. दिवसभर रिक्षा चालवून तो रात्री रिक्षा तिची मावस बहिणीच्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळील टिळकनगर-कामगार नगर परिसरात पार्क करतो. बुधवारी रात्री उशिरा दिड वाजता त्याने त्याची रिक्षा कामगारनगर परिसरात पार्क केली होती. रिक्षा पार्क करुन तो त्याच्या बहिणीकडे गेला होता. तिथे त्याला त्याची दुसरी मावस बहिण आल्याचे समजले. त्याने तिला तिचा प्रियकर रोशन हा त्यांच्या घरी आला होता. त्याने तिथे प्रचंड धिंगाणा घालून तिला शिवीगाळ केली होती. तो अनेकदा तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता.

त्याला कंटाळून ती पुण्याला जात आहे असे सांगितले. तिने त्याला चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ सोडण्याची विनंती केली होती. तेथून ती पुण्याला जाणार होती. त्यामुळे तो तिला मैत्री पार्कजवळ घेऊन गेला होता. तिला सोडून तो रात्री अडीच वाजता पुन्हा कामगारनगर येथे आला होता. यावेळी तिथे रोशन आला आणि त्याने त्याच्या बहिणीला कुठे सोडले याचा जाब विचारला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात त्याने त्याच्या ऍक्टिव्हा बाईकवरुन चाकू काढून शंकरवर वार केले ाहेते. त्यात त्याच्या गळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.

यावेळी शंकरने आरडाओरड करुन लोकांकडे मदतीची मागणी केली, त्यामुळे रोशन तेथून पळून गेला होता. तिथे असलेल्या लोकांनी रक्तबंबाळ झालेल्या शंकरला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शंकर जाधवची जबानी नोंदवून पोलिसांनी रोशन डावरे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page