कौटुबिक वादातून आईची मुलाकडून चाकूने भोसकून हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत आरोपी मुलाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – दादर येथे आईची मुलाकडून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रेझीना क्रुझ फर्नाडिस असे या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा मुलगा एडवर्ड क्रुझ फर्नाडिस याला दादर पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कौटुबिक वादातून एडवर्डने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले असले तरी कुठल्या कारणावरुन हा वाद झाला होता याचा खुलासा होऊ शकला नाही.

ही घटना सोमवारी रात्री उशिरा बारा वाजता दादर येथील भवानी शंकर रोड, गॅरेज गल्लीतील राम श्याम इमारतीच्या चवथ्या मजल्याावर घडली. या ठिकाणी रेझीना ही तिचा मुलगा एडवर्ड याच्यासोबत राहत होती. एडवर्ड हा मिळेल ती नोकरी करत होता. कुठलीही नोकरी तो जास्त दिवस टिकवत नव्हता. त्यातच त्याचे त्याच्या आईशी नियमित कौटुंबिक कारणावरुन वाद होत होता. सोमवारी रात्री उशिरा या दोघांमध्ये क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन प्रचंड वाद झाला होता. या वादातून रागाच्या ऍडव्हर्ड याने त्याची आई रेझीना हिच्या छातीवर तिक्ष्ण हत्याराने भोसकले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती.

ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या रेझीनाला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉ. एंजल जॉन्टो यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक् प्रियांका कदम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुलगा एडवर्ड याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. रेझीनाची हत्या केल्यानंतर तो घरातच चाकू घेऊन बसला होता. यावेळी घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते, गुन्ह्यांतील चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.

अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रेझीना आणि एडवर्ड यांच्यातील भांडणाचे कारण समजू शकले नाही. मात्र आईची मुलाकडून झालेल्या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page