पश्‍चिम उपनगरात चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

दोन महिलांना अटक तर दोन महिलांची सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – पश्‍चिम उपनगरात ऑनलाईन चालणार्‍या एका सेक्स रॅकेटचा जोगेश्‍वरी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन वेश्यादलाल महिलांना पोलिसांनी अटक केली तर त्यांच्या तावडीतून दोन महिलांची सुटका केली. या दोन्ही महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान अटकेत असलेल्या दोन्ही महिलांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मंजू आणि अंजली नावाच्या दोन महिला सेक्स रॅकेट चालवत असून त्यांच्या संपर्कात असलेल्या काही तरुणीसह महिलांना वेगवेगळ्या ग्राहकांसोबत जोगेश्‍वरी, वर्सोवा, अंधेरी, सांताक्रुज, जुहू येथील हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये शारीरिक संबंधासाठी पाठवित असल्याची जोगेश्‍वरी पोलिसांना माहिती प्रात झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने या दोन्ही महिलांना संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी त्यांना एका मुलीमागे प्रत्येकी वीस हजार मोबदला असल्याचे सांगून बोगस ग्राहकाला चार तरुणींचे फोटो पाठवून त्यापैकी दोन तरुणींची निवड करण्यास सांगितले. त्याने दोन तरुणीमागे ४० हजार रुपये मोबादला देण्याचे मान्य करुन दोन तरुणींची निवड केली होती.

या ग्राहकाने तिला दोन तरुणींसोबत जोगेश्‍वरीतील पारशी पंचायत रोडवरील एका व्हेज हॉटेलजवळ येण्यास सांगितले होते. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक चारु भारती, पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंदूराव चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली कदम, पोलीस उपनिरीक्षक चिंचनकर, पोलीस शिपाई घाडगे, गौरव कदम, मोंडे, महिला पोलीस शिपाई स्वप्ना जाधव आदी पथकाने तिथे सापळा लावला होता. सोमवारी सायंकाळी वाजता एका व्हॅगनार कारमधून चार महिला हॉटेलमध्ये आल्या होत्या. यावेळी बोगस ग्राहकांशी आर्थिक व्यवहार सुरु असताना पोलिसांनी तिथे छापा टाकला होता.

या कारवाईत पोलिसांनी अंजली आणि मंजू नावाच्या दोन्ही वेश्यादलाल महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून दोन महिलांची सुटका केली. चौकशीत त्यांनी मंजू आणि अंजू या दोघीही त्यांना वेगवेगळ्या ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असून त्यामोबदल्यात काही रक्कम कमिशन म्हणून देत असल्याचे सांगितले. त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर या दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली तर बळीत दोन्ही मुलींना मेडीकलसाठी पाठविले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासात या दोन्ही महिला पश्‍चिम उपनगरात मोबाईलवरुन मुली पुरविण्याचे काम करत होते. प्रत्येकी मुलीमागे वीस हजार रुपये मोबदला घेऊन त्यातील काही रक्कम मुलींना दिली जात होती तर उर्वरित रक्कम त्या दोघीही स्वतकडे ठेवत होत्या. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघींविरुद्ध जोगेश्‍वरी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक तरुणीसह महिलांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page