डिजीटल अरेस्टची भीती दाखवून निवृत्त आयकर अधिकार्‍याला गंडा

फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्‍या आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून वयोवृद्ध निवृत्त आयकर अधिकार्‍याला सुमारे ५१ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी एका आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सफवन अब्दुल हमीद असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात इतर काही आरोपींचे नावे समोर आलीअसून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

७५ वर्षांचे धनंजय बळवंत सावंत हे दहिसर परिसरात राहत असून ते २०१० साली आयकर अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. जानेवारी २०२६ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी समोरील व्यक्तीने पोलीस गणवेश घातला होता. त्याने तो लखनऊ पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रेमकुमार गौतम असल्याचे सांगितले. त्याने त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे एका खाजगी बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉड्रिुंगशी संबंधित लाखो रुपयांचे व्ववहार झाले आहे. यावेळी त्यांनी ते कधीही लखनऊ येथे आले नाही, त्यांचा तिथे कुठल्याही बँकेत खाते नाही असे सांगितले. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या नावाच्या कागदपत्रांवरुन बँकेत खाते उघडून त्यात व्ववहार झाल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांना पोलीस निरीक्षक विजय खन्ना आणि पोलीस महासंचालक राकेश अग्रवाल नाव सांगणार्‍या अन्य दोन पोलिसांनी व्हिडीओ कॉल केला होता. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असून त्यात त्यांना किमान दहा वर्षांचा कारावास होणार असल्याचे सांगितले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला व्हिडीओ कॉलवर चौकशीसाठी हजर राहावे लागेल, या दरम्यान त्यांना हाऊस अरेस्ट केल्याचे सांगितले. या चौकशीबाबत इतर कोणाशी काहीही बोलू नका, त्यांना कॉल करु नका, नाहीतर तुमच्या घरी पोलीस पाठवून तुमच्यावर अटकेची कारवाई केली जाईल अशी धमकी दिली होती.

या प्रकारानंतर धनंजय सावंत हे प्रचंड घाबरले. याच दरम्यान त्यांनी त्यांना काही शासकीय दस्तावेज पाठवून त्यांच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चौकशी पूर्ण होईपर्यंत तंना त्यांना बँक खात्यासह इतर ठेवीची रक्कम सुरक्षित एका बँक खात्यात ट्रान्स्फर करावी लागेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात टप्याटप्याने ५१ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांची चौकशी केली नाही. हा प्रकार त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितला. तिने तिच्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला असता त्यांनी त्यांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे सांगितले. डिजीटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार नाही.

फसवणुकीच्या उद्देशाने सायबर ठगाकडून अशा प्रकारे धमकी दिली जात असल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद सफवन अब्दुल हमीदला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे उघडकीस आले. त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम त्याने गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांना पाठविली होती. त्यासाठी त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून प्राप्त झाली होती. तपासात आलेल्या या ामहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page