बोगस नोटाच्या विक्रीप्रकरणी महिलेसह दोघांना अटक व कोठडी

आरोपींकडून पाचशे रुपयांच्या १०.६४ लाखांचा बोगस नोटा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – बोगस नोटांच्या विक्रीप्रकरणी एका महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दानिश ताहीर खान आणि रुक्साना अब्बासअली मोतीवाला अशी या दोघांची नावे असून ते दोघेही ठाण्यासह कुला्र येथील रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी पाचशे रुपयांच्या १० लाख ६४ हजाराच्या बोगस नोटा जप्त केल्या आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दक्षिण मुंबईतील वासुदेव बळवंत फडके चौक, मैट्रो सिनेमागृहाजवळील काहीजण बोगस नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दोनच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस उपनिरीक्षक संकल्प मोकल, घाटोळ, पोलीस हवालदार राणे, पोलीस शिपाई सय्यद, महिला पोलीस शिपाई क्षीरसागर आदी पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

रविवारी तिथे एक महिला आली होती. या महिलेची हालचाल संशयास्पद वाटताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या २७० बोगस नोटा पोलिसांनी जप्त केल्या. भारतीय चलनाच्या बोगस नोटा खर्‍या असल्याचे भासवून तिने स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी या नोटा विक्रीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिला बोगस नोटांसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिला ते बोगस नोटा दानिश खान याने दिल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक् दिलीप तेजनकर यांच्यासह अन्य पोलीस पथकाने कुर्ला येथून दानिश खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या १८५८ बोगस नोटा जप्त केल्या आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी १० लाख ६४ हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या २१२८ नोटा जप्त केल्या आहे. या दोघांविरुद्ध बोगस नोटा बाळगणे, त्याची विक्री करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना सोमवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात दानिश हा ठाण्यातील कौपरखैरणे तर रुक्साना ही कुर्ला येथील कपाडिया नगर परिसरात राहते. दानिशला बोगस नोटा कोणी दिल्या. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत करत होते का, त्याने बोगस नोटा यापूर्वी चलनात आणले आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page