सोन्याच्या बांगड्या बनविण्यासाठी दिलेल्या गोल्ड बारचा अपहार
१.६० कोटीच्या अपहारप्रकरणी ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२६
मुंबई, – ऍण्टी सोन्याच्या बांगड्या बनविण्यासाठी दिलेल्या एक कोटी साठ लाख रुपयांच्य १०९७ ग्रॅम वजनाचे गोल्ड बारचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार माझगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शब्बीर अली मंडल या ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध भायखळा पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. शब्बीरने तक्रारदारासह इतर ज्वेलर्स व्यापार्याकडून दागिने बनविण्यासाठी घेतलेल्या शुद्ध सोन्याचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
इम्रान फजलूर मंडल हे मूळचे कोलकाता येथील नदीया, हरिणघाटाचे रहिवाशी असून सध्या माझगाव परिसरात राहतात. त्यांचा सोन्याचा दागिने डिझायनिंगचा व्यवसाय आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरु असून त्यांची आय. एम बँगेल्स नावाची एक कंपनी आहे. शब्बीर मंडल हा त्यांचा जुना परिचित मित्र असून त्याचाही सोन्याचे दागिने डिझायनिंगचा व्यवसाय आहे. ते दोघेही वेगवेगळ्या डिझाईनचे सोन्याचे दागिने बनवून त्याची ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री करण्याचे काम करतात. पूर्वी ते दोघेही एकत्र सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करत होते. नंतर त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु होता. इम्रान मंडल हे सध्या माझगाव तर शब्बीर हा दहिसर येथे काम करतो. अनेकदा ते दोघेही एकमेकांसाठी काम करत होते.
शब्बीर हा अँण्टींक डिझानईनच्या सोन्याच्या बांगड्या बनवून त्याच्या बांगड्यांना बाजारात प्रचंड मागणी असते. त्यामुळे त्याने त्याला काही ऍण्टींक बांगड्या बनविण्याचे ऑर्डर दिले होते. ठरल्याप्रमाणे त्याने त्याचा मॅनेजर आशिषला १०९७ ग्रॅम वजनाचे एक कोटी साठ लाख रुपयांचे गोल्ड बार बांगड्या बनविण्यासाठी दिले होते. मात्र ठरलेल्या वेळेत त्याने त्यांना सोन्याचे बांगड्या बनवून दिले नाही. त्यामुळे त्यांनी शब्बीरसह आशिषला कॉल केला होता, मात्र त्यांचे मोबाईल बंद येत होते. चौकशीदरम्यान त्यांना शब्बीरने इतर ज्वेलर्स व्यापार्याकडून सोने घेऊन त्यांना दागिने बनविण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र त्यापैकी कोणालाही त्याला सोन्याचे दागिने बनवून दिले नाही. तो दहिसर येथील शॉप बंद करुन निघून गेल्याची माहिती त्यांना समजली होती. या माहितीने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी शब्बीरला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तो कोलकाता येथील गावी निघून गेल्याची शक्यता असल्याने त्यांनी त्याच्या गावी चौकशी केली, मात्र तो त्याच्या गावीसुद्धा आला नव्हता. ऍण्टींक सोन्याच्या बांगड्या बनविण्यासाठी दिलेल्या १ कोटी ६० लाख रुपयांचे १०९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार घेऊन शब्बीर हा पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी भायखळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शब्बीरविरुद्ध सोन्याचा बारचा अपहार करुन इम्रान मंडल यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या कुटुंबियासह मित्रांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविषयी ठोस माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.