मरिनड्राईव्ह येथील अपघातात वयोवृद्धासह तिघांचा मृत्यू
मृतांमध्ये मैत्रिणीसोबत जाणार्या बर्डर्थ बॉयचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2026
मुंबई, – मरिनड्राईव्ह येथील अपघातात एका वयोवृद्धासह तिघांचा मृत्यू झाला. किशोर पांडुरंग लामणे (66), कृष्णा उदय देसाई (19) आणि चाँदनी इमामली शेख शेख (18) अशी या तिघांची नावे आहेत. यातील कृष्णा देसाईचा रविवारी वाढदिवस होता, वाढदिवसानंतर मैत्रिण मुस्कानला घरी सोडण्यासाठी जात असताना हा अपघात होऊन त्याच्यासह मैत्रिणीचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलिसांनी कृष्णा देसाई याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह मैत्रिण आणि वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बर्थडेच्या दुसर्या दिवशी कृष्णाचा अपघाती मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
हा अपघात सोमवारी सकाळी पावणेसहा वाजता मरिनड्राईव्ह येथील एन. एस रोड, पारशी गेटसमोरील उत्तर वाहिनीवर झाला. कृष्णा देसाई हा मुलुंडच्या म्हाडा कॉलनी, गणेश निवासमध्ये राहत होता. रविवारी त्याचा वाढदिवस होता. रात्री कुटुंबासह मित्रासोबत त्याने वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला आणि कफ परेड येथे राहणार्या त्याची मैत्रिण चाँदनीला भेटण्यासाठी त्याच्या बाईकवरुन आला होता. ते दोघेही रात्री वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेले होते. सकाळी पावणेसहा वाजता वाढदिवसानंतर तो चाँदनीला तिच्या घरी सोडण्यासाठी जात होता. यावेळी चाँदनी ही त्याच्या बाईकच्या मागे बसली होती.
भरवेगात बाईक चालविण्याचा प्रयत्नात त्याचा बाईकवरील नियंत्रण सुटले. एन. एस रोड, पारशी गेटसमोरुन जाताना त्याने रस्ता क्रॉस करणार्या एका वयोवृद्धाला जोरात धडक दिली होती. या अपघातात वयोवृद्धासह कृष्णा आणि त्याची मैत्रिण असे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच मरिनड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने पोलिसांनी जी. टी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असातना या तिघांचा मृत्यू झाला होता. चौकशीअंती या तिघांचे नावे किशोर लामणे, कृष्णा देसाई आणि मुस्कान शेख असल्याचे उघडकीस आले.
यातील किशोर लामणे हे वयोवृद्ध गिरगाव येथील क्रांतीनगर, एकता सोसायटीमध्ये राहत होते. सकाळी ते मार्निंग वॉकसाठी आले होते. रस्ता क्रॉस करताना भरवेगात जाणार्या कृष्णाने त्यांना जोरात धडक दिली होती. यावेळी किशोर हे काही अंतरावर कोसळले. यावेळी बाईक स्लीप झाल्याने कृष्णासोबत त्याच्या मागे बाईकवर बसलेली मुस्कान हीदेखील जखमी झाली होती. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलिसांनी कृष्णाविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णाने बाईक चालविताना मद्यप्राशन केले होते याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
तिघांचेही मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला नाही. भरवेगात बाईक चालविणे कृष्णासह इतर दोघांच्या जिवावर बेतल्याचे काही प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. कृष्णा हा कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याला अलीकडेच एक नवीन बाईक दिली होती. ही बाईक घेऊन तो चाँदनीला भेटण्यासाठी गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.