हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपी आजन्म कारावासाची शिक्षा
सहा वर्षांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आरोपी दोषी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – गोवंडी परिसरात जुल्फीकार चौधरी या ५० वर्षांच्या व्यक्तीची हत्येप्रकरणी आरोपी अफसर अब्दुल शेख ऊर्फ पंछी याला विशेष सेशन कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने आरोपीने दोषी ठरविले होते. मृत जुल्फिकार चौधरी आणि आरोपी अफसर शेख हे दोघेही नातेवाईक् असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नसरुद्दीन चौधरी हे गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहत असून मृत जुल्फिकार त्यांचे वडिल होते. याच परिसरारत अफसर हा राहत असून तो त्यांचा नातेवाईक आहे. त्याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यातच त्याचे त्यांच्याच एका नातेवाईक तरुणीसोबत विवाह झाला होता. या विवाहाला जुल्फिकार यांचा विरोध होता. त्यातून त्यांच्यात खटके उडत होते. याच रागातून मार्च २०२० रोजी अफसरने जुल्फिकार यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांच्या छातीला, पाठीला, पोटाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी नसरुद्दीन चौधरी याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अफसर शेख याच्याविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. तपास पूर्ण होताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची गेल्या सहा वर्षांपासून नियमित सुनावणी सुरु होती. अलीकडेच ही सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी न्या. यु. के सोरटे यांनी आरोपी अफसर शेख याला हत्येसह अन्य कलमांतर्गत दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावणी आहे.
आरोपीला शिक्षा होण्यसाठी विशेष सेशन कोर्टात शिवाजीनगर पोलिसांकडून शास्त्रीय, प्रभावी तपास, सबळ पुराव्यांचे संकलन आणि त्याचे योग्य प्रकारे दस्तऐवजीकरण सादर करण्यात आले होते. या पुराव्याच्या आधारे त्याला कोर्टाने दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी अभियोक्ता चौधरी, लाडे यांनी पोलिसांची बाजू मांडली. पैरवी अधिकारी विजय ठाकूर यांनी कोर्टात प्रभावीपणे सादरीकरण केले. तसेच न्यायायलयीन कामकाजात सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णांत माने यांनी सरकारी पक्षाशी योग्य समवन्य साधला होता. त्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा संशयाचा फयदा न घेता सिद्ध होऊन त्याला कठोर शिक्षा होण्यास मदत झाली.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णांत माने, पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर, पोलीस हवालदार देवरे, पोलीस शिपाई गोगावले, महिल पोलीस शिपाई सोनावणे, झेले यांनी केली.