आयआयटी वसतिगृहात बाथरुममधील व्हिडीओ प्रकरणाने खळबळ

32 वर्षांच्या एम टेकच्या माजी विद्यार्थ्यांला अटक व सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पवइतील आयआयटी वसतिगृहात बाथरुममधील व्हिडीओ ऑन करुन विद्यार्थ्यांचे आंघोळीसह इतर विधी करताना व्हिडीओ काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राहुल अमरजीत पांडे या 32 वर्षांच्या माजी विद्यार्थ्यांविरुद्ध पवई पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून या मोबाईलमध्ये काही विद्यार्थ्यांचे नग्न अवस्थेतील आंघोळीसह इतर विधी करताना व्हिडीओ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अश्लील व्हिडीओ काढून राहुल पांडेने त्यांच्या एकांतपणाचा तसेच खाजगीपणाचा भंग केल्याचा आरोप आहे.

अनिल बालाजी मुंडे हे पवईतील आयआयटी कॅम्पस, हिल साईडमधील इमारत क्रमांक तेरामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. 2006 साली ते आयआयटीमधये सुरक्षारक्षक म्हणून रुजू झाले होते. सध्या ते तिथे सुरक्षा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असून तिथे काही विद्यार्थी शिक्षण घेऊन वसतिगृहात राहतात. रविवारी अनिल मुंडे हे आयआयटी मेनगेटवर दिवसपाळी कर्तव्यावर होते. यावेळी काही विद्यार्थी राहुल पांडे याला घेऊन जात असल्याचे दिसून आले.

चौकशीदरम्यान राहुलने मुलांच्या बाथरुममध्ये तसेच शौचालयात मोबाईल ठेवून मुलांचे आंघोळीसह इतर विधी करताना व्हिडीओ काढत असल्याचे समजले. त्यामुळे त्याला काही विद्यार्थ्यांनी पकडले होते. त्यानंतर आयआयटीच्या व्हिजिलन्स टिममधील महेंद्र म्हात्रे, दादूभाई यादव यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान राहुल हा ठाण्यातील रामचंद्रनगर, देव अशोका सोसायटीमध्ये राहतो. त्याने आयआयटीमधून जुलै 2025 रोजी इलेक्ट्रिकल विभागातून एम टेकचे शिक्षण पूर्ण केले आहे.

सध्या तो नोकरीच्या शोधात होता. कामानिमित्त तो आयआयटीमध्ये आलाद होता. तिथेच त्याचा एक मित्र राहत होता. याच मित्राकडे राहत असताना त्याने पाचव्या मजल्यावरील हॉस्टेल क्रमांक चौदाच्या मुलांच्या बाथरुममध्ये चोरुन मोबाईल ऑन करुन ठेवला होता. त्याच्या मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्यात वेगवेगळ्या विद्यार्थ्याचे बाथरुममधील आंघोळ करताना नग्न अवस्थेतील व्हिडीओ तसेच शौचालयातील काही व्हिडीओ मिळून आले. त्याच्याविरुद्ध कोणीही विद्याथी पोलिसांत तक्रार करण्यास पुढे आला नाही.

मात्र या घटनेची आयआयटी प्रशासनाने गंभीर दखल अनिल मुंडे यांना पवई पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल मुंडे यांनी आयआयटी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या वतीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आला. रविवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आलेल्या या घटनेने वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थी वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page