लैगिंक अत्याचार करुन महिलेची तोतया पोलिसांकडून फसवणुक

आरोपी पोलीस पतीविरुद्ध अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – लग्न जुळविणार्‍या एका खाजगी वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणीशी बोगस लग्न करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिची तोतया पोलीस पतीने फसवणुक केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैभव दिपक नारकर या तोतया पतीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह दोन लाख ऐंशी हजाराच्या कॅशसहीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वैभव हा सध्या सोलापूर सायबर सेल पोलिसांच्या एका गुन्ह्यांत अटकेत असून त्याचा लवकरच नेहरुनगर पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक करुन त्याची चौकशी केली जाणार आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन त्याने मुंबईसह इतर शहरात काही गुन्हे केले आहे का याचा पोलीस तपास करणार आहे.

33 वर्षांची पिडीत तरुणी ही चेंबूर परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. लग्नासाठी तिने लग्न जुळविणार्‍या एका खाजगी वेबसाईटवर स्वतची माहिती अपलोड करुन नोंदणी केली होती. याच साईटवर तिची वैभव नारकरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर जून 2025 रोजी ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. यावेळी त्याने तो पोलीस दलात कामाला असल्याचे सांगितले होते. तिची प्रोफाईल त्याला आवडली होती, त्यामुळे त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिनेही त्याला होकार दिला होता. काही दिवसांनी त्यांनी तिच्याशी लग्न केले होते.

लग्नापूर्वी ते दोघही नवी मुंबईतील बेलापूर, सेक्टर पंधरा, महेश कॉम्प्लेक्स, पाम बीच लॉज, प्लॉट क्रमांक 37 तसेच तिच्या राहत्या घरी भेटत होते. या भेटीदरम्यान त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तिचा विश्वास संपादन करुन तिची सुझुकी स्कूटी घेतली होती. तिच्याकडे पैशांची मागणी करुन तिला ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही त्याला दोन ते तीन वेळा पैसे दिले होते. लग्नाच्या वेळेस तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, अंगठी घेतली होती.

काही दिवसांनी तिला वैभव नारकर हा पोलीस दलात कामाला नसल्याचे तसेच त्याने अशाच प्रकारे पोलीस असल्याची बतावणी करुन इतर काही गुन्हे केल्याचे समजले होते. ही माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. चौकशीदरम्यान तिला वैभव नारकरविरुद्ध सोलापूर येथील सायबर सेल पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत एक गुन्हा असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला लोकलक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत हा प्रकार उघडकीस येताच तिने नेहरुनगर पोलीस ठाण्यात वैभव नारकरविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पैशांसह सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याचा ताबा सोलापूर सायबर सेल पोलिसांकडून घेतला जाणार आहे. त्याचा ताबा मिळावा यासाठी सोलापूर येथील लोकल कोर्टात पोलिसांकडून अर्ज केला जाणार आहे. ताबा मिळताच त्याला या गुन्ह्यांत अटक करुन त्याची चौकशी केली जाणार आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करणार आहे. दरम्यान वैभव हा दादरच्या नायगाव, म्हाडा कॉलनी दोन, स्वप्नपूर्ती अपार्टमेंटच्या रुम क्रमांक 1907 मध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page