मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अंधेरी येथे सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी सपना छोटू तिवारी नावाच्या एका ३२ वर्षांच्या महिलेस अटक केली तर दोन तरुणींची सुटका केली. मेडीकलनंतर या दोघींनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सपनाविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सपना ही पैशांचे आमिष दाखवून काही मॉडेलच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात उघडकीस आले.
सपना ही भांडुप येथे राहत असून तिच्या संपर्कात काही मॉडेल आहेत. या मॉडेलच्या मदतीने ती सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सपनाला संपर्क साधला होता. तिच्याकडे काही मॉडेलची मागणी करण्यात आली होती. यावेळी तिने ग्राहकाला त्याच्या व्हॉटअप काही मॉडेलचे फोटो पाठविले होते. या मॉडेलसोबत शारीरिक संबंधासाठी तीस ते पत्तीस हजार मोबदला द्यावे लागतील असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकाकडे तिच्याकडे त्याच्यासह त्याच्या दोन मित्रांसाठी तीन मॉडेलची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यातील चॅटदरम्यान तीन मॉडेलसाठी एक लाख वीस हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर सपनाने त्याला श्रीजी हॉटेलजवळील आरोमास कॅफेजवळ येत असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी सपना ही दोन तरुणीसोबत संबंधित हॉटेलमध्ये आली होती. यावेळी ग्राहकासोबत तिचे आर्थिक व्यवहारासदर्ंभात चर्चा सुरु असताना तिथे अंमलबजावणी पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी सपनाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणीची पोलिसांनी सुटका केली. यावेळी एका तरुणीने तिची सपनासोबत साकिनाका येथील पबमध्ये ओळख झाली होती. तिची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तिने तिला पैशांचे आमिष दाखवून या सेक्स रॅकेटमध्ये आणले होते. तिच्या सांगण्यावरुन ती ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी विविध हॉटेलमध्ये जात होती. ग्राहकाकडून मिळणारी अर्धी रक्कम सपना तर उर्वरित रक्कम तिला मिळत होती. या दोन्ही तरुणींना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पंधरा आणि बारा हजार रुपये देण्याचे सपनाने मान्य केले होते. त्यासाठी ते दोघीही तिथे आल्या होत्या. तपासात आलेल्या या माहितीनंतर सपनासह दोन्ही तरुणींना ओशिवरा पोलिसांकडे सोपविण्यात आले. यावेळी सपनाविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही तरुणींना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.