चेंबूर येथे दोन वेगवेगळ्या घटनेत वयोवृद्धासह दोघांवर हल्ला

हत्येच्या प्रयत्नाच्या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2026
मुंबई, – चेंबूर येथे दोन वेगवेगळ्या घटनेत एका वयोवृद्धासह तरुणावर त्यांच्याच परिचित आरोपींने चाकूने वार करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. जखमींमध्ये मंगाराम देसराज धिलोड (62) आणि संदीप यादव (24) यांचा समावेश असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली आहे. सुरज राहुल कांबळे ऊर्फ दाद्या, रिझवान मोहम्मद अली खान, कृष्णा हरिजन राजभर आणि जतीन निलेश कनोजिया अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील पहिली घटना मंगळवाी रात्री पावणेबारा वाजता चेंबूर येथील म्हाडा माहुल, इमारत क्रमांक पंधराजवळ घडली. याच इमारतीच्या रुम क्रमांक 225 मध्ये मुकेश ही महिला तिचा पती मंगारामसोबत राहते. मंगळवारी रात्री ती तिच्या पतीसोबत घराच्या बाहेरील पॅसेजमधील पलंगावर बसले होते. यावेळी तिथे रिझवान, कृष्णा आणि जतीन आले. त्यांनी त्यांना फयुमवर वीजचोरीचा आरोप करता का, नवीन मोटारसाठी पैसे देत नाही या कारणावरुन त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मंगाराम यांना लाथ्याबुक्यांने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील चाकूने त्यांच्या ळपोटात भोसकले होते. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे जखमी झालेल्या मंगाराम यांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना काही तासांत पोलिसांनी अटक केली.

दुसर्‍या घटनेत प्रेमसंबंध तोडून प्रेयसीचे दुसर्‍या तरुणाशी लग्न लावून दिले म्हणून संदीप यादव या तरुणावर आरोपीने चाकूने वार केले होते. गळ्यावर आणि पोटावर गंभीर दुखापत झाल्याने संदीपला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सुरज कांबळे याला पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता चेंबूर येथील सह्याद्रीनगर, बुद्धविहारजवळल टॉवर हिलसमोर घडली. याच पसिरात यातील 29 वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. संदीप हा त्यांच्या बहिणीच्या नंदेचा मुलगा आहे. त्यांच्या भाचीचे अलीकडेच लग्न झाले होते. तिच्यसोबत सुरज कांबळेचे प्रेमसंबंध होते.

त्यांचे प्रेमसंबंध तोडून तिचे दुसरीकडे लग्न लावण्यास तिचे घरातील सर्वच मंडळी जबाबदार आहेत असा संशय सुरजला होता. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता त्याने संदीप यादववर प्राणघातक हल्ला केला होता. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले होते. तसेच दोन ते तीन वेळा चाकूने पोटात भोसकले होते. त्यात संदीप हा गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुरजला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत चारही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page