रेल्वे प्रवाशादरम्यान सीटवरुन वाद घालून अज्ञात प्रवाशांकडून लुटमार

साडेदहा लाखांचा मुद्देमाल पळविणार्‍या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2026
मुंबई, – मुंबई-बनारस रेल्वे प्रवाशांदरम्यान आरक्षण केलेल्या सीटवरुन वाद घालून अज्ञात व्यक्तींनी सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुद्देमालासह विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि ऐंशी हजाराच्या कॅशचा समावेश आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या अज्ञात आरोपी प्रवाशांचा शोध सुरु केला आहे.

श्रीकांत शितलीप्रसाद मिश्रा हे 54 वर्षांचे तक्रारदार मालाड येथे राहतात. फोर्ट येथील एका खाजगी कंपनीत ते लॉ ऑफिसर म्हणून कामाला आहेत. 24 एप्रिलला ते त्यांची पत्नी पुष्पासोबत उत्तरप्रदेशातील त्यांच्या बनारस गावी जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एलटीटी-बनारस एक्सप्रेस गाडीने जात होते. यावेळी त्यांच्या डब्ब्यात आधीच चार ते पाच व्यक्ती बसले होते. ते त्यांच्या सीटवर बसले होते, त्यांनी ती सीट त्यांची असून त्यांना तेथून उठण्यास सांगितले, मात्र या व्यक्तींनी सीटवरुन उठण्यास नकार दिला. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यांनी त्यांना जास्त वाद घालू नकोस नाहीतर चालत्या गाडीतून बाहेर फेंकून देऊ अशी धमकी दिली होती.

रात्री अकरा वाजती ही गाडी सुटली. यावेळी त्यांनी त्यांना वारंवार विनंती करुनही त्यांनी त्यांना त्यांच्या सीटवर बसू दिले नाही. हा प्रकार एका प्रवाशाच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्यातील वाद मिटवून त्यांना त्यांच्या सीटवर बसण्यास दिले होते. ही गाडी कल्याण रेल्वे स्थानकात येताच त्यांनी त्यांच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्रमांक 139 वर संपर्क साधून ही माहिती सांगितली. खंडवा रेल्वे स्थानकात गाडी येताच रेल्वे पोलिसांनी त्यांना गाडीतून उतरण्यास सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी तक्रार केली नाही.

26 एप्रिलला रात्री दोन वाजता ही गाडी बनारस रेल्वे स्थानकात आली. तेथून ते त्यांच्या गावी निघून गेले होते. घरी गेल्यानंतर त्यांना बँगेत त्यांचे विविध सोन्या-चांदीचे दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवाशादरम्यान संबंधित आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून त्यांच्या बॅगेतील विविध सोन्याचे, चांदीचे दागिने आणि ऐंशी हजाराची कॅश असा 10 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ुमुंबईत आल्यांनतर 9 मेला लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

या तक्रारीची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध सीटवरुन वाद घालून तक्रारदाराच्या बॅगेतील सुमारे साडेदहा लाखांच्या मुद्देमालाची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page