पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पित्याकडून लैगिंक अत्याचार

पोक्सोच्या गुन्ह्यांत ५५ वर्षांच्या आरोपी पित्याला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची तिच्याच नराधम पित्याने लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ५५ वर्षांच्या आरोपी पित्याला देवनार पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

पिडीत मुलगी ही गोवंडी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून ती सध्या शिक्षण घेते. आरोपी तिचे वडिल असून ते काहीच कामधंदा करत नाही. मार्च महिन्यांत घरातील सगळेजण झोपले असताना त्याने त्याच्याच मुलीशी अश्‍लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्याच्याय आरोपी पित्याने गैरफायदा घेतला होता. मार्च ते एप्रिल २०२६ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून तो तिला धमकावत होता. काही दिवसांपूर्वीच तिला पोटात दुखू लागले होते.

वैद्यकीय उपचारानंतर ती गरोदर असल्याचे उघडकीस आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिची तिच्या कुटुंबियांनी चौकशी केली असता हा प्रकार धक्कादायक प्रकार उघड झाला. या घटनेनंतर तिने देवनार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या पित्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोळा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणारा गजाआड
दुसर्‍या घटनेत भांडुप येथे एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी ३१ वर्षांच्या आरोपी भांडुप पोलिसांनी अटक केली. पिडीत मुलगी भांडुप येथे राहत असून आरोपी हा तिच्या परिचित आहे. २९ जुलैला त्याने तिला त्याच्या घरी बोलाविले होते. तिथे त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्‍लील चाळे केले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुला बघून घेईल अशी धमकी दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. तरीही तिने भांडुप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page