डिजीटल अरेस्टची भीती दाखवून गंडा घालणार्‍या टोळीचा पर्दाफाश

सात आरोपींना ३४ लाखांसह गुन्ह्यांतील इतर मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – डिजीटल अरेस्टची भीती दाखवून गंडा घालणार्‍या एका टोळीचा पश्‍चिम प्रादेशिक विभगाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. त्यात संजय हेरालाल शहा, ऋषी रामचंद्र मिना, नौशादअली दिलशाद अली, मोहम्मद खलिद हाफिजुद्दीन सैफी, जगेश्‍वर महतो यांच्यासह एका महिलेसह दोघांचा समावेश आहे. या टोळीने एप्रिल महिन्यांत एका आयटी सल्लागार व्यावसायिकाला मनी लॉड्रिुंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून त्यांची १ कोटी ६७ लाख ४० हजाराची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एकूण २७ मोबाईल, दोन लॅपटॉप, पाच डिजीटल साईन डिव्हाईस, ६१३ विविध कंपनीचे सिमकार्ड, दोन पासबुक, दोन एटीएम कार्ड तसेच गुन्ह्यांतील बँक खात्यात ठेवण्यात आलेली ३४ लाखांची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

५५ वर्षाचे तक्रारदा सांताकुज येथे राहत असून आयटी कल्सल्टींगचे काम करतात. २ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांना काही अज्ञात व्यक्तींनी कॉल करुन ते पोलीस असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर करुन एका नामांकित बॅकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यात मनी लॉड्रिंगचे लाखो रुपये रक्कम ट्रान्स्फर झाले आहेत. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे काही पुरावे पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगून त्यांना डिजीटल अरेस्ट केल्याची धमकी दिली होती. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांनी त्यांना व्हिडीओ कॉल करुन ते पोलीस असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होात.

त्यांना पोलिसांचा लोगो असलेले पत्र, सर्वोच्च न्यायालयाचे नाव आणि शिक्का असलेले इलेक्ट्रॉनिक दस्तावेज पाठविले होते. त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात १ कोटी ६७ लाख ४० हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. चौकशी संपताच त्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले, मात्र त्यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पश्‍चिम सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम सायबर सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव, नितीन गच्चे, अमोल माळी, सविता कदम, अंजली वाणी, शंकर पाटील, विजयकुमार घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक दिपक तायडे, अविनाश नलावडे व अन्य पोलीस पथकाने आरोपींचा शोध सुर केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती गोळा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. ही माहिती काढल्यानंतर या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून एका महिलेसह सातजणांना ताब्यात घेतले होते.

तपासात संजय शहाने गुन्ह्यांतील आरोपींना सिमकार्ड, ओटीपी पुरविले होते, महिलेने गुन्ह्यांतील ५० लाख ६० हजाराची रक्कमेची विल्हेवाट लावली होती. याकामी तिला ऋत्रषी मिनाने मदत केली होती. नौशादअलीने गुन्ह्यांतील तक्रारदारांना संपर्क साधण्यासाठी सिमकार्ड मिळवून दिले होते. मोहम्मद खलीदने डिजीटल अरेस्टची धमकी देताना आलेले कॉल रुट करण्याचे काम केले तर जगेश्‍वर महतो याने गुन्ह्यांतील फसवणुकीची १ कोटी १७ लाखांची कॅश बँक खात्यात स्विकारुन साथीदारांच्या मदतीने विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले. तपासात आलेल्या या माहितीनंतर या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

यावेळी या सातही आरोपींकडून पोलिसांनी विविध बँकेत गोठविण्यात आलेली ३४ लाखांसह मोबाईल, लॅपटॉप, डिजीटल साईन सर्व्हिसेस, सिमकार्ड, चेकबुक आणि एटीएम कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी यावेळी चार आरोपींना ११ ऑगस्ट तर तीन आरोपींना १७ ऑगस्टपर्यंत पोली कोठडी सुनावण्यात आले आहे. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत मुख्य आरोपीसह इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page