शिक्षणासाठी जाणार्‍या तरुणीवर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – शिक्षणासाठी जाणार्‍या एका तरुणीला रस्त्यावर गाठून तिच्यावर एका तरुणाने लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात घडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अनिल रामचरण करोटिया या ३१ वर्षांच्या आरोपीस मुलुंड पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मुलुंड येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बळीत तरुणी ही मुलुंड परिसरात राहत असून सध्या शिक्षण घेते. ६ ऑगस्टला पहाटे ती शिक्षणासाठी जात होती. यावेळी तिचा एका अज्ञात व्यक्तीने पाठलाग करुन तिला जबदस्तीने जवळच्या झाडीमध्ये नेले. तिथेच त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने त्याला जोरदार विरोध केला होता. या झटापटीत तिला दुखापत झाली होती. या घटनेनंतर तिने घडलेला प्रकार मुलुंड पोलिसांना सांगितला होता. त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. सहा विशेष पथकाने २५० हून अधिक सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता.

ही शोधमेाहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन होनवडजकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन खाडगे, मायादेवी काळगावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बनसोडे, मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल महाजन, विक्रम ताकमोगे, विकास चव्हाण, सागर नाळे, अंमलदार किरण चव्हाण, हेमंत शेडगे, राजेश चौगुले, रणजीत माळी, संदीप परदेशी, अशोक भोर, अशोक खराडे, विवेक शिंपी, सागर गावडे, भिमराव तरडे, महेश सरकरे यांनी अनिल करोटिया याला ठाण्यातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच बळीत तरुणीशी अश्‍लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात आरोपीचा तिथे नियमित वावर असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. अटकेनंतर त्याला मुलुंडच्या लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मायादेवी काळगावे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page