पोलीस असल्याची बतावणी करुन २५ लाखांचे दागिने पळविले

पळून गेलेल्या तिन्ही तोतयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणीक करुन एका व्यापार्‍याच्या डिलीव्हरी बॉय कर्मचार्‍याकडून सुमारे २५ लाखांचे सोन्याचे, हिरेजडीत दागिने घेऊन तीन अज्ञात व्यक्तींनी पलायन केल्याची घटना चिराबाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

प्रदीप सुदाम कदम हा त्याच्या कुटुंबियांसोबत खारदांडा परिसरात राहतो. तो अमरचंद्र मैती या व्यापार्‍याकडे डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला असून गिरगाव येथील ऑपेरा हाऊसमध्ये त्याचे कार्यालय आहे. गुरुवारी दुपारी त्याचे मालक अमरचंद्र मैती यांनी त्याला २५ लाख ३७ हजार रपुयांचे सोन्याचे आणि हिर्‍यांचे दागिने दिले होते. ते दागिने त्याला मिराजभाई आणि दिपेशभाई यांच्या दुकानात डिलीव्हरी करायचे होते. त्यामुळे तो दुपारीच दागिन्यांच्या डिलीव्हरीसाठी त्याच्या कार्यालयातून बाहेर पडला होता.

दुपारी तीन वाजता तो जेएसएस रोड, चिराबाजार येथील दत्ता डिस्पले सर्व्हिस दुकानासमोरुन जात होता. याच दरम्यान तिथे तीन तरुण आले. त्यांनी त्याला पोलीस असल्याचे सांगून त्याच्याकडील सामानाची तपासणी करण्यास सुरुवात केली होती. त्याच्याकडील दागिन्यांचे बिल दाखविण्याची मागणी केली. बिल नसेल तर त्यांनी त्याच्याावर दंडात्मक कारवाईची धमकी दिली होती. त्याला पोलीस ठाण्यात चल सांगून त्यांनी त्याच्याकडील दागिन्यांची बॅग घेतली.

काही वेळानंतर ते तिघेही तेथून पळून गेले होते. त्याने त्यांचा पाठलाग केला, मात्र ते तिघेही पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या प्रकाराने तो प्रचंड घाबरला आणि त्याने घडलेला प्रकार त्याचे मालक अमरचंद्र मैती यांना सांगितला. त्यांनी त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला, त्यामुळे तो एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात आला आणि तिथे उपस्थित पोलिसांना त्याने घडलेला प्रकार सांगितला.

त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न सुरु केला आहे. भरदिवसा तसेच भरस्त्यात घडलेल्या या रॉबरीच्या घटनेने परिसरातील व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page