नैरोबीहून आणलेल्या कोकेनसह विदेशी महिलेस अटक

१०.६५ कोटी रुपयांचे २.१२८ किलो कोकेन जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जुलै २०२६
मुंबई, – नैरोबीहून आणलेल्या कोकेनसह एका विदेशी महिलेस छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनानयाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्‍यांनी २ किलो १२८ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १० कोटी ६५ लाख रुपये इतकी किंमत आहे. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही महिला फ्रिटाऊनहून नैरोबीमार्गे मुंबईत आल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांत विदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होत असल्याने तपास यंत्रणांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही कारवाई सुरु असताना एक विदेशी महिला रविवारी रात्री उशिरा फ्रिटाऊनहून नैरोबीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवर आली होती. तिच्या सामानाची एक्स-रे मशिनद्वारे तपासणी करण्यात आली होती, त्यात या अधिकार्‍यांना तिने तिच्या बँगेत ड्रग्ज आणल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला डीआरआयच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात त्यांना सतरा पाकिटे सापडली. या पाकिटात पांढर्‍या रंगाचे पावडर होते.

चाचणी उपकरणारद्वारे केलेल्या परिक्षणात ती पावडर कोकेन असल्याचे उघडकीस आले. या पाकिटातून या अधिकार्‍यांनी २१२८ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून त्याची किंमत १०. ६५ कोटी रुपये इतकी होती. कोकेन जप्त केल्यानंतर तिच्याविरुद्ध या अधिकार्‍यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर तिला सोमवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page