दोन वेगवेगळ्या कारवाईत सात महिलांसह अकरा बांगलादेशींना अटक

आरोपींकडून भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज सापडले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – मुंबईसह ठाणे ग्रामीण परिसरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या अकरा बांगलादेशी नागरिकांना दोन वेगवेगळ्या कारवाईत जुहू आणि खार पोलिसांनी अटक केली. त्यात सात महिलांचा समावेश असून ते सर्वजण बांगलादेशातील बेरोजगारीसह गरीबीला कंटाळून नोकरीसाठी भारतात पळून आल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक असल्याचे दस्तावेजासह पुरुष, महिलांचे फोटो आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या सर्वांना लवकरच बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठांनी सर्वच पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा, एटीएस तसेच आय शाखेला अशा बांगलादेशी नागरिकांविरुद् विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी परिसरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांची माहिती सुरुवात केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना मंगळवारी २९ सप्टेंबरला खार पोलिसांनी परिसरात वास्तव्यास असलेल्या तीन महिलांसह सहा बांगलादेशी नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील उपलब्ध कागदपत्रांसह ओळखीसंबंधित माहितीची पडताळणी करण्यात आली होती. त्यात ते सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत सहाही नागरिकांना पोलिसांनी अटक केली.

इक्बाल अकबरअली शेख ऊर्फ गौतम सुनिल दत्ता, राणा मौल्ला मदादुल मौल्ला ऊर्फ राणा शाह, समीम मिझानूर सरदार ऊर्फ राजू नरेंद्र, मोसमद मुंजिला खातून ऊर्फ सिला सरदार ऊर्फ रिया दत्ता, माफुजा अख्तर लिमा मोहम्मद हाश्मी काझी ऊर्फ कविता शाह आणि हलीमा अख्तर मोहम्मद झिल्लू खान ऊर्फ मोनिका दत्ता अशी या सहाजणांची नावे आहेत. यातील इक्बाल शेख ऊर्फ सुनिल दत्ता हा त्यांचा म्होरक्या असून त्यानेच इतर आरोपींना बांगलादेशातून मुंबईत आणण्यासाठी मदत करणे, त्यांच्यासाठी बोगस भारतीय दस्तावेज बनवून देणे, रेल्वे प्रवास, राहण्याची जागा आणि रोजगाराची व्यवस्था करुन दिली होती. त्यांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना विविध व्यक्तींच्या नावाचे ४० हून अधिक आधारकार्ड, पॅनकार्ड, इतर ओळखपत्रांचे फोटो, महिलांचे फोटो, क्यूआर कोड, रेल्वे प्रवासाची तिकिट तसेच इतर डिजीटल माहिती मिळून आली.

त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना बांगलादेशातील एक सिमकार्ड, विविध व्यक्तीच्या नावाचे वीसहून अधिक आधारकार्ड सापडले. हा संपूर्ण दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जप्त केलेले आधारकार्डची सत्यता आणि ती कोणत्या कागदपत्रांच्या आधारे बनविण्यात आली होती, त्याची सध्या पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. बांगलादेशातील गरीबीसह बेरोजगाराला कंटाळून मुंबईत आलेल्या बांगलादेशी नागरिकांना तो बोगस भारतीय दस्तावेज बनवून देत असल्याचे उघडकीस आले आहे. बोगस दस्तावेज बनविण्यासाठी त्याला काही एजंटने मदत केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या एजंटच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दुसर्‍या कारवाईत जुहू पोलिसांनी पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली. अकबर अजमीर सरदार, रेजुका उजीर मौल्ला, यास्मिन उजीर मौल्ला, नसीमा बेगम उजीर मौल्ला, खतीजा उजीर मौल्ला अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील अकबर हा सुरक्षारक्षक तर इतर महिला घरकाम करत असल्याचे तपासात उघडकीस आले. नालासोपारा येथील मोरेगाव तलाव परिसरातील एका फ्लॅटमध्ये काही घुसखोर बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक नामदेव बेंबडे, सहाय्यक फौजदार पेडणेकर, नाईक, पोलीस हवालदार गायकवाड, पोली शिपाई कांबळे, चवले, महिला पोलीस शिपाई खांडेकर आदी पथकाने जय जिवदानी चाळ, रुम क्रमांक ४१० मध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी एका पुरुषासह चार महिला आणि दोन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत ते सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.

बांगलादेशातील गरीबीसह बेरोजगार कंटाळून ते सर्वजण कामासाठी भारतात आले होते. नालासोपारा येथे वास्तव्यास असताना ते सर्वजण सुरक्षारक्षक आणि घरकाम म्हणून नोकरी करत होते. अटकेनंतर पाचही आरोपींना शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page