लॅपटॉपच्या पेमेंटसाठी दिलेल्या ३२ लाखांचा अपहार करुन फसवणुक

व्यावसायिकाच्या दोन कर्मचार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – लॅपटॉपच्या पेमेंटसाठी दिलेल्या सुमारे ३२ लाखांचा अपहार करुन स्वतच्या व्यावसायिक मालकाची त्यांच्याच नोकराने फसवणुक केल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही कर्मचार्‍याविरुद्ध डोंगरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. साहिल लक्ष्मणदास गजराणी आणि राजीव बागुमल माकीजा अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही घटना १७ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत डोंगरीतील एस. व्ही रोड, अलकाबा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्स कार्यालयात घडली. गुलामअली मोहम्मदअली सय्यद हे टुर्स व्यावसायिक असून ते आग्रीपाडा परिसरात राहतात. त्यांचा डोंगरी येथे अलकाबा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचे एक खाजगी कार्यालय आहे. तिथेच साहिल गजराणी आणि राजीव माकिजा हे दोघेही काम करतात. १७ जुलै आणि १८ जुलैला त्यांनी कंपनीतील तीन कर्मचारी लॅपटॉपचा माल खरेदीसाठी अनुक्रमे अकरा आणि दहा असे ३२ लाख रुपये दिले होते. त्यापैक्ी सोनू नावाच्या कर्मचार्‍याने त्याच्याकडील दहा लाखांची कॅश साहिलकडे दिली होती. पेमेंटसाठी दिलेली रक्कम त्यांनी संबंधित व्यापार्‍याला दिले नाही.

याबाबत व्यापार्‍याकडून विचारणा झाल्यानंतर त्यांनी साहिल आणि राजीवला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांनी त्यांनी त्यांचे मोबाईल बंद करुन पलायन केले होते. या रक्कमेचा दोघांनी परस्पर अपहार करुन गुलामअली सय्यद यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात दोन्ही नोकराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर साहिल गजराणी आणि राजीव माकिजा यांच्याविरुद्ध ३२ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page