खाजगी क्लासमध्ये विद्यार्थीनीचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच ३३ वर्षांच्या शिक्षकाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – नीट परिक्षेची तयारी करणार्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा तिच्याच खाजगी क्लासच्या शिक्षकाने विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याची गुरु-शिष्याच्या काळीमा फासणारी घटना धारावी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच शिरातुल नावाच्या ३३ वर्षांच्या आरोपी शिक्षकाला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सतरा वर्षांची पिडीत मुलगी धारावी येथे तिच्या पालकांसोबत राहते. ती सध्या नीट परिक्षेचा अभ्यास करत असून त्यासाठी तिने धारावी परिसरातील एका खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. तिथे शिरातुल हा शिक्षक म्हणून काम करत होता. जून महिन्यांत ती क्लासमध्ये एकटीच अभ्यास करत होती. यावेळी तिथे शिरातुल आला आणि त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिला प्रपोज करुन त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि क्लासमधून निघून गेली होती.
सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्याचाच शिरातुलने गैरफायदा घेण्यास सुरुवात केली होती. ७ जुलैला सकाळी सात वाजता त्याने पुन्हा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तिला मिठी मारुन पुन्हा तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. मला तू खूप आवडतेस, तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगून त्याने तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. २१ ऑगस्टला ती क्लासमध्ये असताना त्याने तिच्याशी पुन्हा शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या छातीला पुन्हा नकोसा स्पर्श तसेच तिच्याशी पुन्हा लैगिंक अत्याचार केला होता.
त्याच्याकडून होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने घडलेला प्रकार शाहू नगर पोलिसांना सांगितला. या तक्राची पोलिसांनी गंभीर दखल घेत पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी शिरातुलला त्याच्या धारावीतील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावलली आहे. पिडीत मुलीला नंतर सायन हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. आरोपी शिक्षकाचीही लवकरच मेडीकल होणार आहे. चार दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने खाजगी क्लासेसच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.