घातक शस्त्रांच्या धाकावर कॉलेज तरुणाला लुटणार्या त्रिकुटास अटक
आरोपींच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होणार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – आतेबहिणीसह तिच्या दोन मैत्रिणींना घरी सोडून स्वतच्या घरी जाणार्या एका कॉलेज तरुणाला तीनजणांच्या टोळीने घातक शस्त्रांच्या धाकावर जिवे मारण्याची धमकी लुटल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रॉबरीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना जुहू पोलिसांनी शिताफीने अटक केली. आद मैन्नूउद्दीन माणिहार, दिपेश गोपाळ चव्हाण आणि किशन ऊर्फ मोद्या गणेश देवेंद्र अशी या तिघांची नाव असून अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांचे इतर काही सहकारी आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
१८ वर्षांचा तक्रारदार तरुण मूळचा छत्तीसगढचा रहिवाशी रहिवाशी असून सध्या सांताक्रुज येथे राहतो. कुर्ला येथील कॉलेजमध्ये तो सध्या शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता तो त्याच्या आतेबहिण, तिच्या दोन मैत्रिणीसोबत जुहू चौपाटी येथे फिरायला आला होता. तेथून ते चौघेही उबेर कारमधून घरी जाण्यासाठी निघाले. सांताक्रुज येथे जाण्यापूर्वी त्याने त्याच्या बहिणीसह दोन्ही मैत्रिणींना विलेपार्ले येथील जुहू, वल्लभनगर परिसात सोडले होते. तेथून तो त्याच्या घरी जाणार होता. रात्री दिड वाजता उबेर कारमधून जात असताना तीन तरुणांनी त्यांची कार अडवली. तेथील गर्ल हॉस्टेलमध्ये एका तरुणीवर रेप झाला असून आम्ही युनियन कर्मचारी आहे असे सांगून त्याला कारमधून जुहू हद्दीत फिरवू लागले. त्यांचे इतर दोन सहकारी त्यांच्या कारमागून बाईकवरुन येत होते.
या तिघांनी तक्रारदार तरुणाला घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याच्या मोबाईलमधून एका आरोपीने त्याच्या बँक खात्यात पाच हजार ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर त्यांनी त्याला आणखीन दहा हजार पाठविण्यास सांगितले. त्याच्या बँक खात्यात दहा हजार नसल्याने त्याने त्यांना आणखीन चार हजार पाठविले. त्यानंतर त्यांनी त्याच्या वॉलेटमधून ५ हजार २५० रुपये काढून घेतले. घडलेला प्रकार कोणालाही सांगू नकोस, पोलिसांकडे तक्रार केल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन त्यांनी त्याला सोडून दिले. या परिसरात पुन्हा दिसू नकोस असे सांगून ते तिघेही त्याच्या सहकार्यासोबत पळून गेले. या प्रकाराने तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळे त्याने घडलेला प्रकार त्याच्या मित्रांना सांतितला
त्याचे मित्र तिथे आल्यानंतर ते सर्वजण जुहू पोलीस ठाणयत आले आणि तिथे उपस्थित पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देऊन लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमाहीम सुरु असताना पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना काही तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनी तक्रारदार तरुणाला जिवे मारण्याची धमकी देऊन, घातक शस्त्रांचा धाक दाखवून पैशांची मागणी केली होती. त्याच्याकडून ऑनलाईन नऊ हजार आणि कॅश स्वरुपात सव्वापाच हजार रुपये घेतल्यानंतर ते पळून गेले होते. चौकशीत आलेल्या या माहितीनंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करुन शनिवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. नऊ हजाराची कॅश ज्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली, त्या खातेदाराचा आता पोलीस शोध घेत आहेत.