मालाडच्या नामांकित बँकेत चोरीचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस अटक

सर्व्हर व लॉकर रुमच्या वायरिंगसह सेन्सरचे नुकसान केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – मालाडच्या एका नामांकित बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणार्‍या एका संशयिताला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. प्रदीप रामचंद्र माने असे या संशयिताचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीच्या उद्देशाने बँकेच्या दरवाज्याचे कडी व कोयंडा उचकटून त्याने बँकेत प्रवेश केला आणि सर्व्हर आणि लॉकर रुमच्या वायरिंगसह सेन्सरचे नुकसान केले होते, चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर तो पळून गेला होता, मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत त्याल पोलिसांनी शिताफीने अटक केली.

ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास मालाडच्या एव्हररशाईन नगर, स्टॅण्डर्ड चार्टड बँकेत घडली. श्रेया दिपककुमार सिंग ही महिला अंधेरीतील साकिनाका परिसरात राहते. सध्या ती स्टॅण्डर्ड चार्टड बँकेत ब्रॅच ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करत असून तिची नेमणूक मालाडच्या एव्हरशाईनगरातील शाखेत आहे. बँकेतील सर्व कामकाजाचे व्यवस्थापन पाहण्याची तिच्यावर जबाबदार असून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत बँकेचे कामकाज चालते. मालाडच्या शाखेत सोनाली मिस्त्री या ब्रॅच मॅनेजरसह इतर दहा कर्मचारी कामाला आहेत. दिवसा आनंद सिंग हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो तर रात्री तिथे कोणीही सुरक्षारक्षक नसतो. २० ऑगस्टला श्रेया सिंग ही नेहमीप्रमाणे बँकेत आली होती.

आदल्या दिवशी तिने लॉबीची लाईट बंद केली, मात्र सकाळी गेल्यानंतर तिला लॉबीची लाईट सुरु असल्याचे दिसून आली. तिने कॅश एरियामध्ये जाऊन पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने ऍक्सिस कार्डने कॅश एरियाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिच्याकडून दरवाजा उघडला गेला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने बँकेच्या तळमजला आणि पहिल्या मजल्याची पाहणी केली. त्यात तिला सीसीटिव्ही कॅमेरा काढलेला तसेच रुममधील टेबलचे ड्राव्हर उघडे असल्याचे दिसून आले. कोणीतरी बँकेत प्रवेश करुन बँकेतील सर्व्हर रुममधील वायरिंगसह लॉकर रुमच्या सेन्सरचे नुकसान करुन चोरीचा प्रयत्न केला होता.

हा प्रकार उघडकीस येताच तिने बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी तिथै धाव घेतली होती. यावेळी वरिष्ठांच्या आदेशावरुन श्रेया सिंग हिने बँकेच्या वतीने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने बँकेत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी प्रदीप माने या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली का, त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page