द्रोणाचार्य विजेता गणेश देवरुखकरविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल

सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लगट करणे महागात पडले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – द्रोणाचार्य विजेजा गणेश देवरुखकर यांच्याविरुद्ध विलेपार्ले पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लगट करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. याच गुन्ह्यांत चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

गणेश देखरुखकर हे द्रोणाचार्य पुस्कार विजेते असून काही वर्षांपूर्वी त्यांना राष्ट्रपतीकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. विलेपार्ले येथील पार्लेश्‍वर जिममध्ये ते प्रशिक्षक म्हणून काम करत होते. याच जिममध्ये बळीत मुलगी येत होती. ही मुलगी ही विलेपार्ले येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून सध्या शिक्षण घेत आहे. २१ ऑगस्टला ही मुलगी तिच्या घरी अभ्यास करत होती. रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास तिला गणेश देखरुखकर यांनी एक मॅसेज केला होता. तिनेही त्यांना रिप्लाय दिला.

चॅटदरम्यान त्यांनी तिला जिममध्ये बोलाविले होते. त्यामुळे ती जिममध्ये त्यांना भेटण्यासाठी गेली होती. तिथे गेल्यानंतर त्यांनी जिमची आतून कडी लावली. तिच्याशी जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न केला. तिच्या शिक्षणासह इतर विषयावर चर्चा करुन त्यांनी तिच्याशी लगट करुन तिच्याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घरी जाण्याचा हट्ट केला. यावेळी त्यांनी तिला घडलेला प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून घरी जाण्यास सांगितले.

घरी आल्यानंतर तिने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनी गणेश देखरुखकर यांच्याविरुद्ध विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. चौकशी केल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

या गुन्ह्यांत आरोपीला सात वर्षांपेक्षा कमी असल्याने त्याची चौकशी करण्यात आली, चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान गणेश देवरुखकर यांच्याविरुद्ध पोक्सोतर्ंगत गुन्हा दाखल झाल्याने जिमधील मुलीसह तिच्या पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page