चालक म्हणून काम करणार्या ५४ वर्षांच्या व्यक्तीची आत्महत्या
आजाराला कंटाळून पी/१० वरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – शासकीय अधिकार्यांकडे चालक म्हणून काम करणार्या प्रमोद जाधव या ५४ वर्षांच्या व्यक्तीने गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. आजाराला कंटाळून आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पी/१० वरुन उडी घेऊन त्यांनी जीवन संपविले. त्यांच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली असून त्यात त्यांनी अजारपणामुळे आपण मानसिक नैराश्यातून आत्महत्या करत आहोत, त्यांच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
प्रमोद जाधव हे वरळी परिसरात त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. त्यांची मुलगी सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या ते विविध कोर्टाचे न्यायाधीश, निबंधक, वरिष्ठ शासकीय अधिकार्यांकडे चालक म्हणून काम करत होते. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना एक जुना मूत्रपिंडाचा त्रास होता, त्यावर त्यांचे औषधोपचार सुरु होते, मात्र औषधोपचाराने त्यांना काही फरक जाणवत नव्हता.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणामुळे प्रचंड मानसिक तणावात होते. याच आजाराला कंटाळून त्यांनी पी/१० पातळीवरुन उडी घेतली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. ही माहिती प्राप्त होात. सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल कर्यात आले होते, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला आजारपणामुळे आपण टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यास कोणीही जबाबदार नाही.
आजारावर प्रचंड खर्च होत आहे, तरीही त्यातून काहीच फरक जाणवत नाही. त्यामुळे मी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. ही माहिती नंतर त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यांची जबानी नोंदविण्याचे काम सुरु आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचे काही फुटेज मिळते का याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. दरम्यान प्रमोद जाधव यांच्या आत्महत्येने त्यांच्या वरळीतील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.