मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2026
मिरा-भाईंदर, – लग्नास विरोध केला म्हणून रागाच्या भरात भावी सासूची हत्या करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी करुन गोव्याहून पळून गेलेल्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिटच्या चारच्या अधिकार्यांनी अटक केली. सागर रमेश राऊळ असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा सिंधुदुर्गचा रहिवाशी असून सध्या गोव्यात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी बिचपोलीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ताबा घेतल्यांनतर त्याला गोवा येथे नेण्यात आले आहे.
शैला घाडी ही 58 वर्षांची महिला तिच्या कुटुंबियांसोबत गोव्यातील बिचपोलीस सांखळीमच चिकणे कुडणे, घर क्रमांक 529/3 मध्ये राहत होती. तिच्या मुलीला सागरने लग्नाची मागणी घातली होती. मात्र त्यांच्या लग्नाला शैला हिचा विरोध होता. त्यामुळे तिने तिच्या मुलीचे सागरसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्याचा सागरच्या मनात प्रचंड राग होता. त्यातून त्याने शैलाच्या हत्येची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे 19 मेला सकाळी अकरा ते दुपारी तीनच्या सुमारास तो शैलाच्या घरात घुसला होता.
यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिची हत्या केली होती. या हत्येनंतर तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी करुन सागर पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच बिचपोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मृत शैलाच्या मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सागरविरुद्ध हत्येसह रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येनंतर सागर हा पळून गेला होता. तो गोव्याहून मिरा-भाईदर परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना समजली होती.
या माहितीनंतर संबंधित पोलिसांनी गुन्हे शाखेला आरोपीला अटक करण्याची विनंती केली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सहाय्यक फौजदार मनोहर तावरे, संतोष मदने, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, रविंद्र भालेराव, विजय गायकवाड, प्रविणराज पवार, धनंजय चौधरी, हनुमंत सूर्यवंशी, समीर यादव, अश्विन पाटील, रविंद्र कांबळे, संदीप शेरमाळे, विकास राजपूत, सनी सूर्यवंशी, मसुब सचिन चौधरी, सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी सागरचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच बुधवारी सागरला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच लग्नास विरोध केल्याने शैला घाडी हिची हत्या करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांतील चोरीचे दागिने आणि मोबाईल असा एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्या अटकेची माहिती बिचपोलीस पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित पोलीस पथक मिरा-भाईंदर येथे आले होते. सागरचा ताबा घेतल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी गोवा येथे नेण्यात आले आहे. सागर राऊळ हा मूळचा सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, शिरशिंगेचा रहिवाशी आहे. स्या तो गोव्यातील कोलिंम, तिसवाडी परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.