पवईतील किंग्स स्पामध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

स्पाच्या मालकाला अटक तर तीन महिलांची सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – पवई परिसरात असलेल्या किंग स्पामध्ये चालणार्‍या एका हायफाय सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. या गुन्ह्यांत कुलदीप रामपुकार यादव या स्पाच्या मालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला विशेष कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर या तिघींनाही गोवंडीतील देवनार येथील महिला वसतिगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पवईतील हिरानंदानी, एस. एम शेट्टी कॉलेजवळील डेफोडीलमध्ये किंग्स नावाचे एक स्पा असून तिथे विविध सर्व्हिसच्या नावाने ग्राहकासोबत काम करणार्‍या महिलांना शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त केले जाते. स्पामध्ये मालक तिथे सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पवई पोलिसांना शहानिशा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीची शहानिशा केली होती. यावेळी या बोगस ग्राहकाने तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे पोलिसांना इशारा देऊन माहिती दिली होती.

या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीप गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, सहाय्यक फौजदार शिवराम शितप, अजय पवार, पोलीस हवालदार उदय लांडगे, दिपक बोरसे, महिला पोलीस हवालदार सायरा शेख या पोलीस पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीत कुलदीप हा तिथे येणार्‍या ग्राहकांसोबत त्यांना शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले.

ग्राहकाकडून मिळणारी रक्कम बळीत महिलांना देऊन उर्वरित रक्कम तो स्वत ठेवत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध ३, ४, ५ अनैथतक व्यापार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. स्पामधून पोलिसांनी तिन्ही महिलांची सुटका केली असून त्यांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना देवनाार महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page