बेस्ट बसच्या धडकेने रस्ता क्रॉस करणार्‍या तरुणाचा मृत्यू

तरुणाची ओळख पटली नाही तर बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – बेस्ट बसच्या धडकेने रस्ता क्रॉस करणार्‍या एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख पटली नाही, त्यामुळे त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. याप्रकरणी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करुन आरोपी बसचालक नामदेव गोपाळ काकड याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हा अपघात मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता वरळी येथील डॉ. ए बी रोड, महिंद्रा वरळी मेट्रो स्टेशनसमोरील दक्षिण वाहिनीवर झाला.संदीप रामदास खेंडके हे कल्याण येथे राहत असून सध्या वरळी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी त्यांची रात्रपाळी होती, त्यामुळे ते रात्री आठ वाजता पोलीस ठाण्यात आले होते. काही वेळानंतर ते त्यांच्या सहकार्‍यासोबत परिसरात गस्त घालण्यासाठी निघाले होते. रात्री पावणेअकराा वाजता गस्त घालणार्‍या पोलिसांना मध्य नियंत्रण कक्षातून एक संदेश प्राप्त झाला होता. त्यात महिंद्रा वरळी मेट्रो स्टेशनजवळ एक अपघात झाला असून पोलीस मदतीची गरज आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे ते सहकार्‍यासोबत तिथे गेले होते.

घटनास्थळी पोलिसांना बेस्ट बसने एका व्यक्तीला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करणयत आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपासात पूजा बारीया नावाच्या एका महिलेने पोलिसांना मृत व्यक्ती रस्ता क्रॉस करत होता. यावेळी तेथून जाणार्‍या बेस्ट बसने त्याला धडक दिली होती. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती.

मृत व्यक्तीकडे त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्याचे वय अंदाज २५ ते ३० असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी असलेल्या बेस्ट बसचालक नामदेव काकड याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो ठाण्याच्या विक्रमगढ, खडकी परिसरात राहत असून बेस्टमध्ये बसचालक म्हणून काम करतो. त्याच्याविरुद्ध हलगजीपणाने बस चालवून एका अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page