क्षुल्लक वादातून तरुणाची मित्राकडून चाकूने भोसकून हत्या

हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी मित्राला काही तासांत अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – क्षुल्लक वादातून उबेद इरफान अन्सारी या २१ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. अल्ताफ ऊर्फ मशीन असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, रोड क्रमांक सहा, प्लॉट क्रमांक ५०, फेमस जनरल स्टोरसमोर घडली. इरफान यामीन अन्सारी हा गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहत असून एका सलूनमध्ये काम करतो. उबेद हा त्यांचा मुलगा असून तो काहीच कामधंदा करत नाही. अनेकदा तो त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला कामात मदत करतो.

अल्ताफ हा त्याचा मित्र असून तो गुंड प्रवृत्तीचा आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजता त्याने एका लहान मुलाला घाबरुन त्याच्या कानशिलात लगावली होती. या कारणावरुन उबेद आणि अल्ताफ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. या वादातून त्याने उबेदला बेदम मारहाण केली होती. यावेळी स्थानिक रहिवाशांनी या दोघांमधील भांडण मिटविले होते. दोघांची समजूत काढून त्यांना घरी पाठविले होते.

दुसर्‍याा दिवशी उमेद हा इस्त्रीचे कपडे देण्यासाठी गेला होता. शिवाजीनगर, रोड क्रमांक सहा, फेमस जनरल स्टोरजवळून जात असताना तिथे अल्ताफ आला. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर त्याने उबेदवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी अवस्थेत उबेदला आधी शताब्दी आणि नंतर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

तिथे उपचार सुरु असताना सकाळी साडेदहा वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत इरफान व त्याच्या कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये आले होते. तिथेच त्यांना उबेदचे मित्र सतीश याने घडलेला प्रकार सांगितला.

याप्रकरणी इरफान अन्सारी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अल्ताफविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अल्ताफचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत अल्ताफ याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page